Prime Minister's National Relief Fund: कोरोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी टिक-टॉक करणार 100 कोटींची मदत
Tik Tok (Photo Credits-Gettey Images)

भारतात (Maharashtra) कोरोना विषाणूने (Coronavirus) थैमान घातले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. तसेच कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळू लागली आहे. यातच कोरोना विषाणूला लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Narendra Modi) पंतप्रधान सहाय्यता निधीच्या ( Prime Minister's National Relief Fund) स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले होते. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला संपूर्ण देशातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कलाकारांपासून सर्वसामान्य लोकांपर्यंत अनेक जण आपल्या आर्थिक क्षमतेनुसार सरकारला मदत करत आहेत. करोनाविरुद्ध पुकारल्या गेलेल्या या युद्धात आता ‘टिक-टॉक इंडिया’ (TIK Tok India) देखील सामिल झाले आहे. त्यांनी तब्बल 100 कोटी रुपयांची मदत पंतप्रधान सहाय्यता निधीला देऊ केली आहे.

देशात कोरोना विषाणूचा फैलाव अतिवेगाने होऊ लागला आहे. ज्यामुळे संपूर्ण देशाला अर्थिक संकटाला सामोरे जावा लागत आहे. यातच टिक-टॉक इंडियाने देखील भारताला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कोरोना विषाणूशी लढण्यासाठी टिक-टॉक इंडियाने उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी तब्बल 40 हजार हजमत मेडिकल प्रोटेक्टिव्ह सूट आणि 2 लाख मास्कची मदत करणार आहे. अशा प्रकारे टिक-टॉक कंपनी 100 कोटी रुपयांची मदत करत आहे. देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे पंतप्रधान सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना पंतप्रधान सहाय्यता निधी मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते. हे देखील वाचा- COVID-19 चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी Google Assistant वारंवार करुन देणार स्वच्छ हात धुण्याची आठवण, त्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स

ट्वीट-

टिक-टॉक हे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अॅप्लिकेशन्स पैकी एक आहे. देशातील जवळपास 10 कोटींपेक्षा अधिक लोक टिक-टॉकचा वापर करतात. या अॅपवर अनेक लोक त्यांच्याकडे असलेले टॅलेंट दाखवतात. काही जण गाणे गातात तर, काही जण नृत्य सादर करतात. त्यामुळे अल्पावधीत हे अॅप इतके लोकप्रिय झाले आहे. याच कंपनीने तब्बल 100 कोटी रुपयांची मदत पंतप्रधान सहाय्यता निधीला देऊ केली आहे.