 
                                                                 काळाच्या ओघात आता 4 जी (4G) चा जमाना हळू हळू मागे पडत त्याची जागा 5 जी घेत असल्याचे दिसत आहे. 5 जी फोन नंतर आता चर्चा रंगू लागली आहे ती 5 जी टीव्हीची. तंत्रज्ञान क्षेत्रातील एक महत्वाची कंपनी हुवाई (Huawei) जगातील पहिला 5 जी टीव्ही सादर करण्याच्या तयारीत आहे. महत्वाचे म्हणजे या टीव्हीमध्ये 8 k रेझोल्युशन देण्यात आले आहे. निक्की एशियन रिव्ह्यूज (Nikkei Asian Review) यांनी याबाबत वृत्त दिले आहे.
हा टीव्ही 360 डिग्री व्हिडीओ आणि व्हर्च्युअल रिअलिटी प्रोग्रामसह सेल्युलर कनेक्शनवर हाय-रिझोल्यूशन प्रोग्रामिंग डाउनलोड करण्यास सक्षम असेल. तसेच इतर वायरलेस डिव्हाइसेससाठी हा टीव्ही 5 जी राउटर म्हणून कार्य करू शकेल. सॅमसंगने अलीकडेच 8 के टीव्ही विक्री करण्यास सुरवात केली आहे. इतर कोरियन, जपानी आणि चिनी टीव्ही निर्मान 2020 टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत अशा प्रकारचा टीव्ही सादर करण्याची अपेक्षा आहे. मात्र त्याआधीच हुवाई 8 k रेझोल्युशनसह 5 जी टीव्ही सदर करण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: Samsung ने लॉन्च केला उभी स्क्रीन असणारा टीव्ही; 90 अंशात फिरणार, फोनप्रमाणे करू शकता वापर)
या टीव्हीवर वापरकर्ते 360 डिग्री कोणत्याही दिशेने पाहू शकणार आहेत. हा टीव्ही सध्याचा बाजारात उपलब्ध असलेल्या स्टँडर्ड फुल एचडी टीव्ही पेक्षा 16 पट अधिक चांगले पिक्सल देईल, शिवाय याला स्मार्टटीव्ही प्रमाणे फायबर ऑप्टीक, डीटीएच केबल बॉक्सची गरज भासणार नाही. दरम्यान, चीनची कंपनी शाओमी चक्क दोन स्क्रीन असणारा टीव्ही (Double-Sided TV) बाजारात घेऊन यायची तयारी करत असताना, सॅमसंग (Samsung) कंपनीने उभी स्क्रीन (vertical) असणारा टीव्ही लॉन्च केला आहे. या हटके स्क्रीन फीचरमुळे हा टीव्ही अगदी एका स्मार्टफोन प्रमाणे भासत आहे. द सेरो (The Sero) असे या टीव्हीचे नाव असून, याची स्क्रीन 43 इंच इतकी आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
