विशिष्ट कॉन्टॅक्ट साठी WhatsApp मध्ये Customise Notification Sound कसा सेट कराल?
WhatsApp | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

अनेकजण मोबाईल फोनमध्ये विशिष्ट व्यक्तींच्या फोन साठी खास मोबाईल रिंगटोन (Ringtone) सेट करत होते. आता हा साच प्रकार व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) साठी देखील उपलब्ध आहे. तुम्ही आता व्हॉट्सअ‍ॅप वर देखील कस्टामाईज्ड रिंगटोन सेट करू शकता. व्हॉट्सअ‍ॅप युजर्स कस्टमाईज्ड नोटिफिकेशन टोन, व्हायब्रेशन, पॉप अप आणि लाईट द्वारा निवडू शकतात. मग एका विशिष्ट कॉन्टॅक्ट साठी कशी खास रिंगटोन निवडू शकाल हे पाहण्यासाठी पहा सेटिंग्स मध्ये कसे कराल बदल?

Customise WhatsApp Notification Sound कसा कराल सेट?

  • व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा आणि ज्या व्यक्तीसाठी स्पेशल रिंगटोन सेट करायची आहे त्याचं चॅटबॉक्स ओपन करा.
  • उजवीकडे असलेल्या तीन डॉट्स वर टॅब करा. त्यानंतर “View contact” निवडा.
  • “Customise notifications” निवडा. त्यानंतर “use custom notification” चा पर्याय निवडा.
  • आता या कॉन्टॅक चा मेसेज किंवा कॉल आल्यास तुम्हांला इतरांपेक्षा वेगळी निवडलेली टोन ऐकायला मिळेल.

युजर्स आता लॉंग लिस्ट मधून नोटिफिकेशन टोन निवडून मेसेजसाठी खास टोन निवडू शकतात. यासोबतच थर्ड पार्टी अ‍ॅपच्या मदतीने टोन निवडू शकतात. जर तुम्हांला 'लाईट' निवडायचा असेल तर तो देखील पर्याय आहे. यामध्ये पांढरा, लाल, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा रंग उपलब्ध आहे. व्हायब्रेट कॅटेगरी मध्ये युजर्सना 'डिफॉल्ट', शॉर्ट, लॉंग आणि ऑफ असा पर्याय आहे. कॉल्ससाठी युजर्सना त्यांच्या पसंतीची कोणतीही रिंगटोन निवडू शकता. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना आता “use high priority notification” चा देखील पर्याय मिळणार आहे. यामध्ये युजर्सना स्क्रिनच्या वरच्या बाजूला नोटिफिकेशनचा प्रीव्ह्यु देखील बघायला मिळणार आहे.

कस्टमयझेशनचा हा पर्याय आता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप साठी देखील उपलब्ध असणार आहे. यामुळे आता फोनकडे न पाहताच फक्त रिंगटोन वरूनच कॉल घ्यायचा की नाही? हे ठरवता येणार आहे.