WhatsApp वर सिक्रेट ग्रुपच्या माध्यमातून लपवता येणार फोटो-व्हिडिओ, जाणून घ्या कसे
(WhatsApp: Photo Credits: Pixabay)

जगात करोडोंच्या संख्येने युजर्स असले व्हॉट्सअॅप नेहमीच बदलत्या ट्रेन्डनुसार त्यांच्यामध्ये अपडेट घेऊन येतात. तर व्हॉट्सअॅपवर चॅटिंग शिवाय एखाद्यासोबत फोटो किंवा व्हिडिओ सुद्धा शेअर करण्याचा ऑप्शन युजर्सला देण्यात आला आहे. एखाद्या वेळेस फोन खराब झाल्यास किंवा चोरी झाल्यास व्हॉट्सअॅपवरील फोटो-व्हिडिओ पुन्हा मिळवणे थोडे मुश्किलच होते. मात्र आता युजर्सला व्हॉट्सअॅपवर त्यांचे महत्वाचे डॉक्युमेंट्स ग्रुपमध्ये जतन करता येणार आहे.

आम्ही तुम्हाला येथे व्हॉट्सअॅपवर एका सिक्रेट ग्रुपच्या माध्यमातून डॉक्युमेंट कसे जतन करावेत याची एक सोपी ट्रिक सांगणार आहेत. मात्र या ग्रुपमध्ये तुम्ही एकटेच असणार असून यामधील कोणत्याही फाईल्स कोणीसुद्धा एक्सेस करु शकणार नाही आहेत. तर जाणून घ्या ही ट्रिक कशी तुम्ही वापरु शकता.

-सर्वात प्रथम व्हॉट्सअॅप सुरु करुन डाव्या बाजूला असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करुन नवा ग्रुप तयार करावा लागणार आहे. या ग्रुपचे तुम्ही कोणतेही नाव ठेऊ शकता. त्यानंतर या ग्रुपमध्ये काही जणांना तुम्ही अॅड केल्यानंतर नवा ग्रुप तयार होईल.

-त्यानंतर Group Info या ऑप्शनवर जावे. येथे गेल्यावर तुम्हाला डाव्या बाजूला असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक केल्यावर तेथे तुम्हाला माहिती दाखवली जाईल. त्यानंतर ग्रुपमधील अॅड केलेल्या व्यक्तींना त्यामधून काढून टाका. असे केल्यास तुम्ही ग्रुपमध्ये एकटे रहाल.(WhatsApp युजर्सला आता Chat करताना बदलता येणार रंग, फोनची बॅटरी वाचण्यास होणार मदत)

ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा एक खासगी ग्रुप तयार होईल. या ग्रुपमध्ये तुमच्याशिवाय कोणीही नसणार आहे. येथे तुम्हाला तुमचे फोटो, व्हिडिओ किंवा डॉक्युमेंट्स जतन करता येणार आहेत. या ग्रुपचा वापर तुम्हाला एखादा फोटो किंवा आवडलेली लिंक सेव्ह करण्यासाठी होणार आहे.