(WhatsApp: Photo Credits: Pixabay)

व्हॉट्सअॅपने त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच बदलत्या काळानुसार अपडेट घेऊन येतात. सध्या व्हॉट्सअॅपने सध्या गुगल प्ले बीटी प्रोग्रामच्या माध्यमातून नवे अपडेट 2.20.13 वर्जन रोलआउट केले आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या अपडेट मध्ये युजर्सला गेल्या काही काळापासून बहुप्रतिक्षित असे फिचर लॉन्च केले आहे. WAbetainfo यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, बीटा वर्जनने डार्क थीम लॉन्च केली आहे. म्हणजेच आता युजर्सला चॅटिंग करताना चॅटचे रंग बदलता येणार आहेत. हे फिचर डार्क थीम सारखे दिसणार आहे.

बीटा वर्जनचे हे नवे फिचर वापरण्यासाठी युजर्सला सर्वात प्रथम व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागणार आहे. त्यानंतर WhatsApp Setting मध्ये जाऊन Chats या ऑप्शन मध्ये जावे. यामध्ये युजर्सला Light theme, Dark theme, System Default आणि Set by Battery Saver हे चार ऑप्शन दिले जाणार आहेत. युजर्सच्या अॅन्ड्रॉइड सिस्टिम प्रमाणे व्हॉट्सअॅपची थीम ठरवली जाणार आहे. हे फिचर खासकरुन जे Android Q चा वापरत करतात त्यांच्यासाठी खास असणार आहे.(Twitter वर आता युजर्सना 'Edit' ऑप्शन वापरणे होणार बंद, कंपनीकडून खुलासा)

Tweet:

तसेच Set By Battery Saver हे फिचर अॅन्ड्रॉइड 9 आणि त्याखालील सर्व वर्जन मध्ये काम करते. बॅटरी सेवरच्या प्रमाणे लाईट/डार्क थीम निवडली जाणार आहे. चॅटच्या मागील थीम काळ्या रंगाची असल्यास मेसेज हिरव्या रंगाच्या पट्टीत युजर्सला दिसून येणार आहेत.