Twitter वर आता युजर्सना 'Edit' ऑप्शन वापरणे होणार बंद, कंपनीकडून खुलासा
Twitter logo (Photo courtesy: Twitter)

गेल्या वर्षात ट्वीटर यांच्यी सीईओ जॅक डॉर्सी (Jack Dorsey) यांनी असे सांगितले होते की, युजर्सला ट्वीट करताना 'Edit'  करण्याचा ऑप्शन देण्यात येणार असल्याचे म्हटले होते. मात्र आता पुन्हा ट्वीटरकडून अधिकृतरित्या असे सांगण्यात आले आहे की, आता युजर्सला 'एडिट' ऑप्शन दिले जाणार नाही आहे. Goldman Sachs यांना दिलेल्या एका मुलाखतीत जॅक यांनी ट्वीटर युजर्सला एडिट ऑप्शन मिळणार असल्याचे म्हटले होते. मात्र आता हे ऑप्शन मिळणार नसल्याचा कंपनीकडून खुलासा करण्यात आला आहे.

ट्वीटर युजर्सला एखादे ट्वीट केल्यानंतर त्यामध्ये बदल करण्यासाठी एडिट हे ऑप्शन दिले जाणार नाही आहे. कारण एडिट हे ऑप्शन दिल्यानंतर ट्वीटरची मूळ डिझाइन आणि ओखळ कायम राहावी म्हणून एडिट ऑप्शन न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच डॉर्सी यांनी असे म्हटले की, काही युजर्स त्यांच्या ट्वीटरला अधिक लाईक्स मिळाल्यानंतर ते एडिट करुन खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच या सर्व गोष्टी लक्षात घेता एडिट ऑप्शन आम्ही युजर्सला यापुढे देणार नसल्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.(Instagram युजर्ससाठी TikTok सारखे फिचर्स रोलआऊट)

गेल्या काही महिन्यांपूर्वीच ट्वीटरने राजकीय जाहिरातींवर सुद्धा बंदी घातली आहे. याबाबत सुद्धा डॉर्सी यांनी घोषणा केली होती. त्यामुळे राजकीय जाहिराती दाखवण्यातून सुद्धा असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसून आले होते. मात्र आता जगभरात ट्वीटरवर राजकीय जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे.