घरबसल्या TikTok वर पैसे मिळवण्याचे 'हे' पर्याय तुम्हाला माहित आहेत का?
TIk Tok | (Photo Credits-Gettey Images)

अनेक लोक व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टीक टॉकचा वापर करत असतात. सध्या सर्वत्र टीक टॉक (TikTok) व्हिडिओ जास्तीत-जास्त पाहिले जातात. अनेक युजर्स या अॅपवर मजेशीर व्हिडिओ अपलोड करत असतात. पंरतु, तुम्हाला माहित आहे का, हे व्हिडिओ तुमचं उत्पन्नाचं साधन बनू शकतं. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. परंतु, यासाठी तुम्हाला काही पद्धतींचा वापर करावा लागणार आहे. काय आहेत या पद्धती हे जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

सध्या सोशल मीडियावर टीक टॉक व्हिडिओज प्रचंड व्हायरल होतात. अनेक नेटीझन्स हे व्हिडिओ मनोरंजनाचं साधन म्हणून पाहतात. पंरतु, आता हे व्हिडिओ तुम्हाला पैसेही मिळवून देऊ शकतात. तुम्हालाही टीक टॉकवर पैसे मिळवायचे असतील तर खालील पद्धतीचा अवलंब करा. (हेही वाचा - Tik Tok Video: टिक टॉकवर बॉलिवूड अभिनेत्र्यांनाही मागे टाकले 'या' छोट्या मुलीने)

  • सर्वात अगोदर तुम्हाला प्लेस्टोरमधून टीक टॉक अॅप डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर त्यात तुम्हाला तुमची प्रोफाइल तयार करावी लागेल.
  • त्यानंतर तुम्ही या अॅपमध्ये विविध विषयांवर किंवा गाण्यावर व्हिडिओ बनवू शकता. हे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला या अॅपवर जास्तीत जास्त लोकांनी फॉलो करणं गरजेचं आहे.
  • या अॅपवर तुम्ही कोणत्याही विषयावरील व्हिडिओ तयार करून आपले फॉलोवर्स वाढू शकता.
  • तुमचं TikTok प्रोफाइल यू ट्यूब आणि इन्स्टाग्राम अकाउंटला लिंक करा. त्यामुळे तुमचे फॉलोअर्स वाढण्यास मदत होईल.
  • तुमच्या व्हिडिओ जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचला तर तुमच्या व्हिडिओचे ऑरग्यानिक सर्च ट्रॅफिक वाढेल.
  • तुमचा व्हिडिओ जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ट्विटर आणि इन्स्टाग्राम प्रमाणेच जास्तीत- जास्त हॅशटॅगचा वापर करा.

तुमच्या अकाउंटशी जेव्हा लाखो लोक जोडले जातात, तेव्हा तुम्हाला एखादी कंपनी त्यांचे प्रोडक्ट जाहिरातीसाठी देऊ शकते. या जाहिरातीच्या माध्यमातून तुम्ही पैसे मिळवू शकता. परंतु, यासाठी तुमच्या फॉलोवर्सची संख्या जास्त असणं गरजेचं आहे.