
कोणत्याही कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी त्याची वॅलिडिटी (Phone Validity) तपासून पाहणे गरजे असते. त्यामुळे एखाना नवीन किंवा जुना स्मार्टफोन खरेदी करताना त्याची वॅलिडिटी किती आहे हे जाणून घ्या. यामुळे तुम्हाला योग्य स्मार्टफोन तुम्ही खरेदी करत आहात की नाही याबाबत कळू शकणार आहे. लक्षात ठेवा मोबाईलची वॅलिडिटीचे स्टेटर ब्लॅक लिस्टेड, डुप्लीकेट किंवा ऑलरेडी इन युज असे दाखवत असल्यास असे स्मार्टफोन खरेदी करणे टाळा. तर तुम्ही Know Your Mobile (KYM) च्या माध्यमातून फोन खरेदी करण्यापूर्वी त्याची वॅलिडिटी तपासून पाहू शकता. त्याचसोबत कोणत्याही स्मार्टफोनची वॅलिडिटी तपासून पाहण्यासाठ IMEI याची गरज असते. IMEI हा 15 अंकी क्रमांक दिलेला असतो.
IMEI हा क्रमांक मोबाईलच्या पॅकिंग बॉक्सवर लिहिलेला असतो. त्याचसोबत मोबाईलच्या बिलावर सुद्धा लिहिण्यातत येतो. मात्र जर तुम्ही जुना एखादा स्मार्टफोन खरेदी करत असल्याच त्याची वॅलिडिटी किती आहे हे जाणून घ्या. तसेच तुमच्या स्मार्टफोनवरुन *#06# डायल करुन पाहा. या क्रमांकावर फोन लावल्यास तुम्हाला मोबाईलच्या स्क्रिनवर IMEI क्रमांक दाखवण्यात येईल. तर पुढील पद्धतीच्या सहाय्याने तुम्हाला मोबाईलची वॅलिडिटी तपासून पाहता येणार आहे.
-SMS च्या माध्यमातून तपासून पहा
SMS च्या माध्यमातून वॅलिडिटी जाणून घेण्यासाठी तुम्हाला स्मार्टफोनच्या सहाय्याने KYM<15 अंकी IMEI क्रमांक> टाइप करवा लागणार आहे. तर टाइरप केलेला हा मेसेज तुम्ही 14422 या क्रमांकावर पाठवल्यास तुम्हाला मोबाईल वॅलिडिटी संबंधित अधिक माहिती मिळेल.
-KYM अॅपच्या मदतीने तपासून पहा
मोबाईलची वॅलिडिटी समजून घेण्यासाठी तुम्ही KYM अॅप डाऊनलोड करुन त्यामधून अधिक माहिती मिळवू शकता. तर अॅन्ड्रॉइड आणि आयओएस युजर्ससाठी हा अॅप उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.(दिवाळीपूर्वी LED आणि LCD होणार स्वस्त, मोदी सरकारचे नागरिकांना मोठं गिफ्ट)
-Web पोर्टलच्या माध्यमातून तपासून पहा
तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या स्मार्टफोनच्या मोबाईलची वॅलिडिटी समजून घेण्यासाठी पुढील www.ceir.gov.in/Device/CeirIMEIVerification.jsp या संकेस्थळाला भेट देऊ शकता. या वेबसाईटवर तुम्हाला मोबाईल क्रमांक देणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर मोबाईलवर एक OTP आल्यानंतर तो पुढील माहितीत पोस्ट करा. असे केल्यानंतर तुम्हाला पुन्हा IMEI क्रमांक विचारल्यानंतर तुम्हाला स्मार्टफोनची अधिक माहिती मिळणार आहे.
तर वरील काही सोप्या पद्धतीने तुम्ही एखाद्या स्मार्टफोनची वॅलिडिटी तपासून पाहू शकता. तसेच बाजारात सध्या विविध कंपन्यांचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. परंतु युजर्सला त्याच्या पसंदीप्रमाणे स्मार्टफोन घेण्याची इच्छा असते परंतु फोन घेण्यापूर्वी काही गोष्टींबाबत माहिती असणे सुद्धा तेवढेच अत्यावश्यक आहे.