WhatsApp Useful Tips: व्हॉट्सअॅपद्वारे English मध्ये चॅट करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये करा 'या' सेटिंग्स
WhatsApp (Photo Credit: File/PTI)

इंग्रजी (English) भाषेतून चॅटींग (Chatting) करताना अनेकांना काही समस्या येतात. भाषेवरील पकड मजबूत नसल्याने काहीवेळा आत्मविश्वास गमावल्यासारखा वाटतो. तुम्हालाही ही समस्या जाणवते का? तर तुमच्या समस्येचे निवारण साध्या सोप्या सेटिंग्समधून होणार आहे. या सेटिंग्स स्मार्टफोनमध्ये केल्यास तुम्ही देखील अगदी सहजपणे इंग्रजीमधून चॅटिंग करु शकता. हे सगळं करणं अगदी सोपं आहे. फोनमध्ये या विशिष्ट सेटिंग्स करुन तुम्ही व्हॉट्सअॅप (Whatsapp), फेसबुकस (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) अशा कोणत्याही सोशल मीडिया साईट्सवरुन इंग्रजीमध्ये चॅट करु शकता किंवा पोस्ट करु शकता.  (WhatsApp लवकरच घेऊन येणार एक नवे फिचर, युजर्सची Storage ची समस्या होणार दूर)

या सेटिंग्स मोबाईलमध्ये इंस्टॉल करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरुन दोन अॅप्स डाऊनलोड करा. त्यात एक आहे जी बोर्ड (Gboard) आणि दुसरा आहे ट्रान्सलेशन (Translation). त्यानंतर जी बोर्ड आणि ट्रान्सलेशन ओपन करुन अलाऊ करा. त्यानंतर व्हॉट्सअॅप वरुन गुगल जी बोर्ड मध्ये जा.

तिथे भाषा सिलेक्ट करा आणि ट्रान्सलेशन ऑप्शन ऑन करा. या सेंटिंगद्वारे तुम्ही हिंदीत टाईप केल्यानंतर मेसेज इंग्रजीत ट्रान्सलेट होईल. इतकंच नाही तर तुमची हिंगलिश म्हणजेच इंग्रजीत हिंदी टाईप केले तरी देखील तुमचा मेसेज इंग्रजीत ट्रान्सलेट होईल. (WhatsApp Web च्या माध्यमातूनही आता करता येणार व्हिडिओ कॉल; पहा त्यासाठी Messenger Room कशी कराल?)

व्हॉट्सअॅप हे लोकप्रिय मेसेंजिग अॅप असून संवाद साधण्यासाठी सर्रास वापरले जाते. त्यामुळे या सेटिंगद्वारे तुम्ही अगदी सहज व्हॉट्सअॅपद्वारे इंग्रजीतून चॅट करु शकता. तसंच तुमची इंग्रजी भाषेची कमजोरी समोरच्याच्या लक्षातही येणार नाही. अनेकांना ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल, अशी आशा आहे.

दरम्यान, व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवेनवे फिचर्स सादर करत असतं. अलिकडेच आलेल्या नव्या अपडेटनुसार, युजर्सना WhatsApp Web च्या माध्यमातूनही व्हिडिओ कॉल करता येणार आहे. तसंच याद्वारे मेसेंजर रुम देखील बनवता येईल.