HONOR X30i (Photo Credits-Twitter)

स्मार्टफोन कंपनी HONOR ने चीनमध्ये आपले दोन नवे स्मार्टफोन HONOR X30i आणि X30 Max लाँच केले आहेत. दोन्ही स्मार्टफोनमध्ये दमदार बॅटरी असून ती फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. या व्यतिरिक्त युजर्सला ऑनर एक्स 30 आय आणि एक्स 30 मॅक्स मध्ये शानदार कॅमेरा ते पॉवरफुल प्रोसेसर मिळणार आहे. तर स्मार्टफोन बद्दल अधिक जाणून घ्या.(Battlegrounds Mobile India Diwali Offers: जिंका बोनस UC, लकी स्पिन रिवॉर्ड्स आणि बरंच काही)

कंपनीने Honor X30i च्या 6GB/128GB बेस मॉडेलची किंमत 1399 चीनी युआन (16,000 रुपये भारतीय किंमत) ठेवण्यात आली आहे. तर याच्या 8GB/256GB टॉप मॉडेल 1899 चीनी युआन (22,220 रुपये) मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला या डिवाइसचा प्रो वेरियंट म्हणजेच X30 Max स्मार्टफोनच्या 8GB/128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 2399 चीनी युआन (28,000 रुपये) आणि 8GB/256GB वेरियंटची किंमत 2699 चीनी युआन (31,600 रुपये) ठेवण्यात आली आहे.

HONOR X30i स्मार्टफोन 1080x2388 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले दाखवतो. तर X30 Max स्मार्टफोनला 7.09-इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले मिळेल. त्याचे रिझोल्यूशन 1080x2280 पिक्सेल आहे. दोन्ही उपकरणांमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. याशिवाय यूजर्सना X30i मध्ये MediaTek Dimensity 810 चिपसेट आणि X30 Max मध्ये MediaTek Dimensity 900 प्रोसेसर मिळेल.

HONOR X30i स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपने दिला आहे. यामध्ये 48MP प्राइमरी सेन्सर, 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. तर X30 Max स्मार्टफोनमध्ये 64MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. याशिवाय, दोन्ही स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP कॅमेरा आहे.(JioPhone Next स्मार्टफोन लॉन्च; 4 नोव्हेंबर पासून सेलला सुरुवात)

HONOR X30i स्मार्टफोनमध्ये 4,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, तर मॅक्स व्हेरिएंटमध्ये 5000mAh बॅटरी मिळेल. दोन्ही फोनची बॅटरी 22.5W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याशिवाय दोन्ही स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि 5जी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.