Battlegrounds Mobile India Diwali Offers: जिंका बोनस UC, लकी स्पिन रिवॉर्ड्स आणि बरंच काही
Battlegrounds Mobile India Diwali Offers (Photo Credits: BGMI)

यंदा सणासुदीच्या हंगामात दक्षिण कोरियान गेम डेव्हलपर कंपनी क्राफ्टनने (Krafton) नव्या ऑफर्स सादर केल्या आहेत. मंगळवारी बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडियाच्या (Battlegrounds Mobile India) फेसबुक (Facebook) पेजवर एका पोस्टरद्वारे ही माहिती जाहीर करण्यात आली. दिवाळीसाठी कंपनीने बोनस UC (Bonus UC), मर्यादित काळासाठी लकी स्पिन रिवॉर्ड्स (Lucky Spin Rewards) आणि खेळाडूंसाठी अतिरिक्त फायदे जाहीर केले आहेत.

BGMI खेळाडू कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय लगेच UC खरेदी करू शकतात. खेळाडूंना लकी स्पिनवर सवलत देखील मिळू शकते, जिथे त्यांना नवीन कॉस्ट्यूम, वेपन स्किन, हेल्मेट आणि बरेच काही अनलॉक करण्याची संधी मिळू शकते. (Battlegrounds Mobile India गेम जाणून घ्या कसा कराल डाऊनलोड)

लकी स्पिन ऑफरमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंना UC ची आवश्यकता असणार आहे. जर युजर्सना गेममध्ये थेट सौंदर्यप्रसाधने खरेदी करायची असतील तर ते त्यांचे UC वापरून तसे करू शकतात. युजर्स गेमच्या मुख्य मेनूमधील 'UC' आयकॉनवर क्लिक करून UC खरेदी करू शकतात.

Android साठी UC च्या किंमती:-

UC किंमत
60 UC 75 रुपये
300 UC + 25 UC bonus 380 रुपये
600 UC + 60 UC bonus 750 रुपये
1500 UC + 300 UC bonus 1,900 रुपये
3000 UC + 850 UC bonus 3,800 रुपये
6000 UC + 2100 UC bonus 7,500 रुपये

iOS साठी UC च्या किंमती:-

UC किंमत
60 UC 89 रुपये
300 UC + 25 UC bonus 449 रुपये
600 UC + 60 UC bonus 899 रुपये
1500 UC + 300 UC bonus 2,099 रुपये
3000 UC + 850 UC bonus 4,199 रुपये
6000 UC + 2100 UC bonus 8,500 रुपये

Battlegrounds Mobile India Diwali Offers (Photo Credits: BGM)

मर्यादित काळासाठी उपलब्ध असलेल्या लकी स्पिन रिवॉर्ड्समध्ये नेदर अरिस्टो सेट, पम्पकिन कॅव्हलियर सेट, मेका रीपर सेट, बॉन्ड्स ऑफ ब्लड सेट, मेका ब्रुझर सेट आणि पम्पकिन कॅव्हलियर कव्हर यांचा समावेश आहे. शिवाय, खेळाडूंना लकी स्पिनकडून लकी कॉइन्स देखील मिळू शकतात ज्यावर पम्पकिन कॅव्हलियर कव्हर, नेदर अरिस्टो सेट आणि बरेच काही अनलॉक करण्यासाठी पुन्हा दावा केला जाऊ शकतो.