ऑनर 8X (Photo Credit : Twitter)

स्मार्टफोन कंपनी ऑनरने भारतीय बाजारात आपला नवा हँडसेट Honor 8X लॉन्च केला आहे. या फोन बॅक बॉडीसह टू-टोन फिनिशसोबत बनवला आहे. Honor 8X च्या 4 जीबी रॅम वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. तर 6 जीबी रॅम वेरिएंटची किंमत 64 जीबी स्टोरेज आणि 128 जीबी स्टोरेज याची किंमत अनुक्रमे 16,999 आणि 18, 999 रुपये आहे. 24 ऑक्टोबरपासून अॅमेझॉन इंडियावर याची विक्री सुरु होईल. हा फोन रेड, ब्लॅक आणि ब्लू रंगात उपलब्ध होईल.

फिचर्स

- हा फोन EMUI 8.2.0 वर आधारित अॅनरॉईड 8.1 ऑरियोवर काम करतो.

- यात 6.5 इंचाचा फुल एचडी आणि आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे.

- याचे पिक्सल रेजोल्यूशन 1080 x 2340 इतके आहे.

- या फोनमध्ये 3750 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

- यात ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. याचा प्रायमरी सेंसर 20 मेगापिक्सल तर सेकंडरी सेंसर 12 मेगापिक्सलचा आहे.

- बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे.

- सेल्फीसाठी या फोनमध्ये f/2.0 अर्पचरसोबत 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

- हा फोन स्लो मोडवर 480 fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करु शकतो.

- कनेक्टीव्हीटीसाठी यात वायफाय 802.11 ए/बी/जी/एन/एसी, ब्लूटूथ व्हर्जन 4.2, जीपीएस/ए-जीपीएस, मायक्रो-यूएसबी आणि 3.5 मिलीमीटरचे हेडफोन जॅक यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.