Jio, Airtel आणि Vodafone-Idea या तिन्ही कंपन्यांचे जाणून घ्या सर्वात स्वस्त प्लॅन्स
Reliance Jio, Airtel, Vodafone, Idea | (Photo courtesy: archived, edited images)

भारतातील विविध टॅलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ केली आहे. Reliance Jio, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने या कंपन्यांच्या दरवाढ केली असून त्याचा फटका थेट ग्राहकांना बसला आहे. Airtel आणि व्होडाफोन-आयडियाचे या दोन टेलिकॉम कंपन्यांचे नवे प्लॅन 3 डिसेंबरपासून लागू करण्यात आले आहेत, तर जिओचे प्लॅन उद्यापासून 6 डिसेंबरपासून लागू होणार आहेत. या तिन्ही कंपन्यांनी एकाच नेटवर्कवर कॉलिंग अद्याप मोफत ठेवली असली तरी इतर नेटवर्कवर मात्र अमर्यादित कॉलिंग संपवली आहे. एक नजर टाकूया या टोनही कंपन्यांच्या बेस्ट प्लॅन्सवर.

Jio 129 / Airtel 148 /Vodafone-Idea 149

या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असणार आहे. त्यातील जिओचा 129 रुपयांच्या प्लॅन तुम्ही निवडला तर एकूण 1 जीबी डेटा आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिटे मिळतात. तर एअरटेलच्या 148 आणि व्होडाफोन 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 2 जीबी डेटा आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिटे मिळतात.

Jio 199 / Airtel 248 / Vodafone-Idea 249 

या तिन्ही कंपन्यांचा हा प्लॅन 28 दिवसांसाठी वैध असेल. तिन्ही कंपन्यांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा वापरण्यास मिळतो. एकाच नेटवर्कवर कॉलिंग फ्री असेल तर अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिटे मिळतील.

'जिओ'च्या कॉल, डाटा प्लॅनच्या टेरिफ मध्ये वाढीसोबतच आता JioFiber साठीदेखील मोजावे लागणार पैसे

Jio 249 / Airtel 298 / Vodafone-Idea 299

वरच्या 2 प्लॅन्सप्रमाणेच या प्लॅनची वैधताही 28 दिवस आहे. फरक इतकाच आहे की, या प्लॅन मध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी फ्री डेटा मिळेल. आणि एकाच नेटवर्कवर कॉलिंग अनलिमिटेड असेल तर अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिटं मिळतील.