आता Huawei ला वापरता येणार नाही Android अपडेट, गुगलने आणली बंदी
Huawei Technologies (File Photo)

गुगलने(Google) चीनी मोबाईल कंपनी हुआवे(Huawei)ला आपले Android ऑपरेटिंग सिस्टम वापरण्यापासून रोख लावला आहे. गुगलने ट्रम्प प्रशासनाच्या(Trump Administration) नवीन निर्देशांचे पालन करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचचले आहे. ह्या महत्त्वपुर्ण निर्णयामुळे आता हुआवे च्या नवीन स्मार्टफोन्समध्ये लोकप्रिय असलेले गुगल अॅप्ससुद्धा दिसणार नाही. गुगलच्या ह्या निर्णयामुळे हुआवे कंपनीला मोठा झटका बसला आहे.  त्याचा परिणाम हुआवे स्मार्टफोन्सच्या विक्रीवर होण्याची शक्यता आहे.

ट्रम्प प्रशासनाने हुआवे कंपनीला त्या कंपनीच्या यादीत समाविष्ट केले ज्यांच्यासोबत अमेरिकन कंपन्या तोपर्यंत व्यापार करु शकणार नाही, जोपर्यंत त्यांच्याजवळ अधिकृत परवाना येत नाही. त्यामुळे गुगलने त्यांच्या आदेशाचे पालन करुन हुआवेला Android अपडेट देण्यापासून रोख लावला आहे.

हुआवे चे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड यांनी दोन महिन्यांआधी असे स्पष्ट केले होते की, गुगल जर त्यांची Android सुविधा देण्यास नकार देत असेल, तर आमची कंपनी स्वत: चे असे एक ओएस बनवेल.

Huawei P30 Pro आणि P30 Lite भारतात लॉन्च; पहा काय आहेत फिचर्स आणि किंमत

गुगलच्या ह्या महत्त्वपुर्ण निर्णयानंतर हुआवेचे Android परवाना रद्द झाला आहे. त्यामुळे आता ह्या डिवाइसेसवर Android अपडेट्स येणार नाही. तसेच हुआवेच्या कोणत्याही डिवाईसवर आता युट्यूब आणि मॅप्स सारखे अॅप्सदेखील मिळणार नाही.