Google Smart Jacket शोधाणार तुमचा मोबाईल
गुगल स्मार्ट जॅकेट (फोटो सौजन्य- ट्विटर)

काही जणांना वस्तू विसरण्याची सवय असते. काही ना काही गोष्टी घरातून निघाल्यावर किंवा बाहेरच्या ठिकाणी आपण विसरुन येतो. अशा परिस्थितीत ती वस्तू पुन्हा मिळेल याची शक्यता फार कमी असते. म्हणून गुगलने (Google) त्याच्या युजर्ससाठी स्मार्ट जॅकेट (Smart Jacket) आणलं आहे. जेणेकरुन तुम्ही स्मार्टफोन विसरलात तर त्याची आठवण हे जॅकेट करुन देणार आहे.

- गुगलने तयार केलेले जॅकेट हे 'Alaways Together' या मोडमध्ये डिझाईन केले आहे. या जॅकेटच्या सहाय्याने आपल्या सोईनुसार जॅकेट आणि फोन यांच्यामधील अंतर सेट करु शकता येणार आहे. तर जॅकेटमध्ये इलेक्ट्रॉनिक अलर्ट देण्यात आला आहे.

- ज्यावेळी तुमच्या स्मार्टफोनवर नोटिफिकेशन येईल त्यावेळी त्याचे संकेत तुम्हाला मोबाईल आणि जॅकेटमधील इलेक्ट्रॉनिक यंत्रणेमध्ये दिसून येईल. तसेच जॅकेट दूर असले तरीही त्यावर फोन आणि नोटिफिकेशन येऊ शकते.

-या जॅकेटचा वापर करण्यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये 'Jacquard app' नावाचे अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. तर तुमचा मोबाईल या जॅकेटशी सिंक (Sink) करणे आवश्यक आहे.

-स्मार्ट जॅकेट हे फक्त मोबाईल शोधण्याचे काम करणार नसून तुम्ही त्याच्या आधारे गाणीसुद्धा ऐकू शकता. तसेच आलेले फोन कॉल आणि टेक्स मॅसेजचे नोटीफिकेशन या जॅकेटच्या माध्यमातून कळणार आहे.

- तर गुगलच्या या स्मार्ट जॅकेटची किंमत 350 डॉलर्स म्हणजेच 25,000 रुपये एवढी आहे.