Google ने झळकावला Pixel 4 चा लूक, युजर्सना स्मार्टफोनच्या फिचर्स संदर्भात उत्सुकता
Google Pixel 4 (Photo Credits-Twitter)

गुगलने त्यांच्या आगामी स्मार्टफोन Pixel 4 चा लूक झळकावला आहे. तर काही दिवसांपासून गुगल पिक्सल 4 बद्दल विविध फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर नुकतेच गुगलने या पिक्सल 4 स्मार्टफोनचे फोटो त्यांच्या ट्वीटवरुन पोस्ट केले आहेत.

येत्या ऑक्टोंबर महिन्यात Pixel सीरिजमधील हा स्मार्टफोन गुगल लॉन्च करण्याची शक्यता आहे. तर गुगलने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये पिक्सल 4 साठी रियर पॅनलनच्या येथे चौकोनी आकारात कॅमेऱ्याचे मॉड्युल असल्याची शक्यता आहे. तर फोटोतून साफ असे दिसून येत आहे की गुगल या स्मार्टफोनसाठी डिस्प्ले फिंगरप्रिंग स्कॅनर देणार आहे.

(Google Maps चे नवे फिचर; प्रवासादरम्यान गाडी चुकीच्या रस्त्याने गेल्यास मिळेल Off Route Alter)

तसेच पिक्सच्या फोटोमध्ये बारकाईने पाहिल्यास त्यामध्ये ड्युअल फ्लॅग सिस्टम आहे. त्याचसोबत काही सेंसर्ससुद्धा देण्यात आले आहेत. गुगलचा पिक्सल सीरिजमधील हा स्मार्टफोन लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टिमचा असणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता युजर्सना याच्या फिचर्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी फार उत्सुकता लागून राहिली आहे.