Google Maps चे नवे फिचर; प्रवासादरम्यान गाडी चुकीच्या रस्त्याने गेल्यास मिळेल Off Route Alter
गुगलने गुगल मॅपमध्ये अतिशय उपयुक्त फिचर्स अॅड केले आहेत. अलिकडेच कंपनी SOS अलर्टस, ऑन-स्क्रीन स्पीडोमीटर यांच्या समवेत 3 नवे फिचर्स जोडले आहेत.
गुगलने (Google) गुगल मॅपमध्ये (Google Maps) अतिशय उपयुक्त फिचर्स अॅड केले आहेत. अलिकडेच कंपनी SOS अलर्टस, ऑन-स्क्रीन स्पीडोमीटर यांच्या समवेत 3 नवे फिचर्स जोडले आहेत. यात ट्रेन, बसचे लाईव्ह स्टेटस देखील कळू शकेल. आता गुगल लवकरच एक नवे फिचर युजर्सच्या दमतीला हजर करणार आहे.
या फिचरमुळे तुमचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल. या नव्या फिचर अंतर्गत तुमची टॅक्सी चुकीच्या मार्गाने जात असल्यास तुम्हाला लगेचच अलर्ट केले जाईल. चुकीच्या मार्गाने 500 मीटर गेल्यास Google Maps लगेचच अलर्ट देईल. तुम्ही प्रवास करत असेपर्यंत हे फिचर काम करेल. यामुळे तुम्ही रस्ता चुकण्याचेही भीती नाही.
Google Maps चे हे फिचर XDA डेव्हलपर्स द्वारे सर्वात पहिले स्पॉट करण्यात आले होते आणि हे फिचर सर्व भारतात उपलब्ध असेल. तसंच प्रवासा दरम्यान तुमची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी देखील हे फिचर फायदेशीर ठरेल.
या फिचरचा वापर करण्यासाठी Google Maps मध्ये जावून तुमचे डेस्टिनेशन सिलेक्ट करा. यानंतर स्क्रीनच्या खाली Stay Safer बटणावर क्लिक करा. Stay Safer या फिचर अंतर्गत दोन पर्याय मिळतील. यावरुन तुम्ही आपल्या मित्रांसोबत किंवा नातेवाईक, घरच्या मंडळींसोबत लाईव्ह लोकेशन शेअर करु शकता. तसंच याद्वारे तुम्हाला ऑफ रुट अलर्ट देखील मिळेल.
(The above story first appeared on LatestLY on Jun 11, 2019 04:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

