1 जानेवारी पासून लागू होणाऱ्या Google च्या नव्या नियमांबद्दल येथे जाणून घ्या अधिक
Representative Image (Photo: inquisitr)

गुगल (Google) कडून आरबीआयच्या (RBI) गाइडलाइन्ससच्या नियमात बदल करण्यात येणार आहे. त्याचा थेट परिणाम ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांवर होणार आहे. हा नियम गूगलच्या सर्व सर्विस जसे गुगल अॅड, युट्युब, गुगल प्ले स्टोर आणि अन्य पेमेंट सर्विसवर लागू होणार आहे. अशातच गुगल सर्विस युजर्सला या नव्या नियमांबद्दल अधिक येथे जाणून घेता येईल.(Airtel कडून DoT ला 15,519 कोटी रुपयांचे पेमेंट, जाणून घ्या यामागील मुख्य कारण)

1 जानेवारी 2022 पासून गुगल ग्राहकांचे कार्ड डिटेल्स जसे कार्ड क्रमांक आणि एक्सपायरी डेट सेव्ह केली जाणार नाही. याआधी गुगल तुमच्या सर्व कार्ड डिटेल्स सेव्ह करुन ठेवत होता. अशातच आता ग्राहकाला पेमेंट करायचे असल्यास त्याला फक्त आपला सीवीवी क्रमांक द्यावा लागत होता. दरम्यान, 1 जानेवारी नंचक ग्राहकांना मॅन्युअल ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी कार्ड क्रमांकासह एक्सपायरी तारीख सुद्धा लक्षात ठेवावी लागणार आहे. खरंतर आरबीआयकडून संवेदनशील माहितींची सुरक्षितता तयार करण्याच्या उद्देषाने कार्ड डिटेल्स सेव्ह न करण्याचे निर्देशन दिले आहेत.

जर तुम्ही VISA किंवा MasterCard चा वापर करत असल्यास नव्या फॉर्मेटमध्ये कार्ड डिटेल्स सेव्ह करण्यासाठी अथॉराइज करावे लागणार आहे. तुम्हाला सध्या कार्ड तपशीलांसह मॅन्युअल पेमेंट करावे लागणार आहे. त्यानंतर कार्डची माहिती पुन्हा देण्यापासून दूर राहण्यासाठी 31 डिसेंबर पूर्वी पूर्ण पेमेंट करावे लागणार आहे.(Facebook, Instagram आणि WhatsApp वापरण्यासंबंधित बदलले नियम, जाणून घ्या अधिक)

तसेच RuPay, American Express, Discover किंवा Diners Card चा वापर करत असाल तर गुगल कडून तुमच्या कार्डचे डिटेल्स 31 डिसेंबर नंतर सेव्ह केले जाणार नाही आहेत. हे कार्ड नवे फॉर्मेट स्विकार करत नाही. अशातच 1 जानेवारी 2022 पासून तुम्हाला प्रत्येक मॅन्युअल पेमेंट करताना कार्ड डिटेल्स द्यावे लागणार आहेत.