मेटाने (Meta) आपल्या पॉलिसीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच येणाऱ्या दिवसात फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप वापरण्यासंबंधित नियमात बदल होणार आहेत. नवे नियम हे सामाजिक मुद्द्यांवरील जाहिरातीसंबंधित असणार आहेत. हे नियम लागू झाल्यानंतर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जाहिरात पोस्ट करणार असाल तर त्यासंबंधित अधिक माहिती द्यावी लागणार आहे. त्याचसोबत अन्य काही बदल ही केले जाणार आहेत. तर जाणून घ्या अधिक.
खरंतर गेल्या काही वर्षात मेटावर निवडणूकीला प्रभावित केल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. त्यामुळेच मेटा आपल्या प्लॅटफॉर्मला अधिक पारदर्शी आणि जबाबदार दाखवण्याच्या प्रयत्नात आहे. याच कारणामुळे मेटाने आपल्या प्लॅटफॉर्मवर काही नवे नियम लागू केले आहेत. कंपनीने दावा केला आहे की, निवडणूकीवेळी उत्तम सुरक्षितता आणि लोकांना मतदान देण्यासह आपला प्लॅटफॉर्म उत्तम बनवण्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे.(New SIM Rules: तुम्ही किती सिम कार्ड वापरता? मोबाईल नंबर बंद होण्यापूर्वीच जाणून घ्या हा नियम)
>>कोणत्या जाहिरातांसाठी लागू होणार नियम:
-गुन्हेगारी
-अर्थव्यवस्था
-आरोग्य
-सामाजित मुद्द्यांसंबंधित जाहिरात
-चर्चा, वाद आणि वकिली जाहिराती
-राजकीय मूल्ये आणि शासन
-नागरिक आणि सामाजिक अधिकार
-शिक्षण आणि सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण
तर सोप्प्या शब्दात सांगायचे झाल्यास युजर्सला आपली माहिती उघडपणे सांगता आली नाही तर त्या संबंधित जाहिरात करता येणार नाही आहे. असाच प्रकार 2019 मध्ये भारतात निवडणूकीवेळी दिसून आला होता. त्यानुसार जाहिरातदारांना सरकार तर्फे फोटो आयडीचा वापर केल्यानंतर जाहिरातींचे पेमेंट केले होते. मेटाच्या विधानानुसार, फेसबुकवर राजकीय, निवडणूक किंवा सामाजिक मुद्द्यांसंधित जाहिरात डिस्क्लेमर शिवाय योग्य पद्धतीने जरी पोस्ट केली असेल तरीही ती प्लॅटफॉर्मवरुन काढली जाणार आहे. त्याचसोबत कंपनी अशा पद्धतीची जाहिरात देणाऱ्या लोकांना ब्लॅक लिस्टमध्ये सुद्धा टाकू शकते.