Google Pixel 6 स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च, One Plus Nord2 आणि Oppo Reno 6 ला देणार टक्कर
Google Pixel (Photo Credits-Twitter)

गुगल पिक्सल 6 स्मार्टफोन लवकरच बाजारात लॉन्च केला जाणार आहे. कंपनीने Oppo Reno 6 सीरिजच्या एन्ट्री पूर्वी गुगल पिक्सल 5 आणि पिक्सल 4ए 5जी बंद केली आहे. म्हणजेच कंपनी नवे स्मार्टफोन तयार करणार नाही आहे. फक्त शिल्लक राहिलेले स्टॉक विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. अशी अपेक्षा आहे की, गुगल पिक्सल 6 अंतर्गत दोन स्मार्टफोन लॉन्च केले जाऊ शकतात. मात्र अद्याप कंपनीने गुगल पिक्सल आणि पिक्सल 6 प्रो लॉन्च केला जाऊ याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.(Lenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत)

9to5Google च्या रिपोर्टनुसार पिक्सल 5 आणि पिक्सल 4ए5जी सध्या युएस वेबसाइटवरुन हटवण्यात आला आहे. तर भारतात हे दोन्ही स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. अशी अपेक्षा आहे की, गुगल पिक्सल 6 सीरिज भारतापूर्वी युरोपियन मार्केटमध्ये लॉन्च केला जाणार आहे. पिक्सल 6 स्मार्टफोनची टक्कर OnePlus Nord2 आणि Oppo Reno 6 सोबत होणार असल्याचे मानले जात आहे. संभावित स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास गुगल पिक्सल 6 स्मार्टफोनचा कॅमेरा आणि अन्य स्पेसिफिकेशन प्रकरणी OnePlus Nord2 आणि Oppo Reno6 सोबत जोरदार टक्कर देणार आहे.(Oppo Reno 6 Series: ओप्पोच्या रेनो 6 सिरीज 5जी स्मार्टफोनची जिओसोबत स्टँडअलोन नेटवर्क चाचणी यशस्वी)

गुगल पिक्सल 6 स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा FHD+ एमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. याचा रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह उतरवला जाऊ शकतो. लीक रिपोर्ट्सनुसार पिक्सल 6 सीरिजचा स्मार्टफोन 50MP प्रायमरी कॅमेरासह येणार आहे. त्याचसोबत 12MP चा अल्ट्रा वाइड लेन्सचा सपोर्ट दिला जाऊ शकतो. फोनमध्ये सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.