Lenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत
Lenovo Legion 5 Pro (Photo Credits: Lenovo)

गेमप्रेमींसाठी टेक्नोलॉजी ब्रँड लेनोवो (Lenovo) ने आपला नवीन गेमिंग लॅपटॉप लेनोवो लीजन 5 प्रो (Lenovo Legion 5 Pro) भारतात लॉन्च केला आहे. हा लॅपटॉप Storm Grey या रंगात उपलब्ध असून हा लॅपटॉप तुम्ही Amazon.in आणि Lenovo.com वरुन खरेदी करु शकता. या लॅपटॉपमधल्या NVIDIA GeForce RTX 3060-16GB ग्राफिक्स असलेल्या वेरिएंटची किंमत 1,39,990 रुपये इतकी असून NVIDIA GeForce RTX 3070- 32GB ग्राफिक्स असलेल्या वेरिएंटची किंमत 1,59,990 रुपये इतकी आहे.

या लॅपटॉपसोबत गेमर-सेट्रिंक लिजन अनलमिटेड सपोर्ट देणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. हा सपोर्ट फक्त गेमर्स युजर्ससाठी कंपनीने सुरु केला असून याची किंमत वर्षाला 999 रुपये तर दोन वर्षाला 1,999 रुपये इतकी आहे.

सध्याच्या काळाता पीसी गेमिंग आणि e-sports ला खूप मागणी आहे. यामुळे चांगला गेमिंग अनुभव देणाऱ्या मशिन्सची मागणी देखील वाढली आहे. गेमिंग कम्युनिटीमधून मिळालेल्या फिडबॅकनुसार आम्ही नवीन गेमिंग डिव्हाईस बनवत राहतो जेणेकरुन युजरला गेमिंग अनुभव अधिक चांगला मिळेल, अशी माहिती लेनोवो इंडियाचे दिनेश नायर यांनी दिली आहे.

Legion 5 Pro मध्ये 16 इंचाचा  QHD 165Hz IPS डिस्प्ले दिला असून याचा रिसपॉन्स टाईम 3ms इतका आहे. यामध्ये 16:10 चा आस्पेक्ट रेशो दिला असून 2560x 1600 चा स्क्रिन रिजोल्यूशन दिला आहे. या लॅपटॉपमध्ये AMD Ryzen 5000 सिरीजचा प्रोसेसर, NVIDIA GeForce RTX 3070 चे ग्राफिक्स दिले आहेत. लॅपटॉप हिट नियंत्रणात आणण्यासाठी यामध्ये थर्मल सेन्सर, टर्बो चार्ज असलेले ड्युअल फॅन आणि क्वॉड चॅनल एक्झॉस्ट सिस्टम देण्यात आली आहे. या लॅपटॉपमध्ये लेनोवो चा वेंटेज स्पॉटवेअर आणि रॅपिड चार्ज प्रो दिल्यामुळे पावर मॅनेजमेंट अगदी सहजरित्या करता येते.