आपण एखादा उत्तम फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर गुगल (Google) आपल्याला एक चांगली संधी देत आहे. गुगलने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन पिक्सेल 3 एक्सएल (Pixel 3XL) ऑक्टोबर 2018 मध्ये सादर केला होता. याच्याबरोबर गुगल पिक्सेल 3 देखील बाजारात आला होता. आता Pixel 3XL स्मार्टफोनवर गुगल तब्बल 28 हजार रुपयांची सवलत देत आहे. कंपनीने या स्मार्टफोनला 83,000 रुपये किंमतीत लॉन्च होते, मात्र आता आपण हा फोन 54,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ही किंमत त्याच्या 4 जीबी Ram आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे.
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकॉर्ट (Flipkart) गुगल पिक्सेल 3XL वर 28,000 रुपये बंपर डिस्काउंट ऑफर करत आहे. या फोनचा स्टॉक समाप्त होईपर्यंत हा डिस्काउंट दिला जाणार आहे. सोबतच फ्लिपकॉर्ट गुगलच्या इतर फोन्सवरही डिस्काउंट देत आहे.
या फोनवर चालू आहे सवलत -
Pixel 3 (4 GB + 64 GB)- Rs 52,499
Pixel 3 (4 GB + 128 GB)- 58,999
Pixel 3 XL (4 GB + 64 GB)- Rs 54,999
Pixel 3 XL (4 GB + 128 GB)- Rs 65,999
पिक्सेल 3 एक्सएल स्मार्टफोनचे बहुतेक फीचर पिक्सल 3 स्मार्टफोन सारखेच आहेत. फक्त त्यांच्या डिस्प्ले आणि बॅटरीमध्ये फरक आहे. पिक्सेल 3 एक्सएल मध्ये 6.3 इंच QHD+ (2960x1440 पिक्सल्स) फ्लेक्सिबल OLED डिस्प्ले आहे, ज्याच्या एस्पेक्ट रेशो 18:5:9 आहे. यामध्ये HDR सपोर्ट आणि 100,000:1 कॉन्ट्रास्ट रेशो यांसारखे फीचर्स दिले आहेत. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, यात फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 3430mAh बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की एकदा चार्ज केल्यानंत हा फोन 7 तास 15 मिनिटे चालेल. (हेही वाचा: Tik Tok ऍपची पालक कंपनी लाँच करणार स्मार्ट फोन, Byte Dance कंपनीने केला करार निश्चित)
दरम्यान, Pixel 3 XL च्या दोन्ही व्हेरिएंटच्या स्मार्टफोनवर 21,000 रुपये पर्यंत एक्सचेंज ऑफर आहे. तसेच अॅक्सिस बँकेच्या बजेट क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 5 टक्के ज्यादा डिस्काउंट दिला जात आहे.