Google Pay (Photo Credits-Twitter)

सध्या सोशल मीडियामधील विविध अॅपच्या माध्यमातून अवघ्या काही मिनिटांत पैसे ट्रान्सफर करता येतात. त्यासाठी गुगल पे (Google Pay), पेटीएम (Paytm) यांसारखे अन्य अॅप पैसे पाठवण्यासाठी उपयोगी येतात. तर आता गुगल पे युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण गुगलने त्यांच्या डिजिटल वॉलेट प्लॅटफॉर्मध्ये बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनमध्ये नवे फिचर लॉन्च केले आहे. खरंतर गुगलने अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनसह बायमेट्रिक सिक्युरिटी फिचर आणले होते. त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्यासाठी गुगल पे चा वापर केला जात होता. यापूर्वी पैशांच्या संदर्भात व्यवहार करण्यासाठी PIN क्रमांक द्यावा लागत होता. मात्र नव्या अपडेटनुसार त्यामध्ये बदल करण्यात आला आहे.

गुगलने नव्या अपडेटनुसार GPay मध्ये Biometric API सपोर्ट दिला आहे. त्यानुसार युजर्सला पैसे ट्रान्सफर करण्यासाठी फिंगरप्रिंट (Fingerprint Authentication) आणि फेस ऑथेंटिकेशनचा उपयोग करता येणार आहे. यामुळे हे नवे फिचर पिन क्रमांकापेक्षा अधिक वेगाने काम करणार आहे. मात्र सध्या हे फिचर अॅन्ड्रॉइड 10 साठी काम करते. तर लवकरच अॅन्ड्रॉइड 9 व्हर्जनसाठी सुद्धा हे काम करणार आहे.(Google Pay वरुन इलेक्ट्रिक बिल भरणे पडले महागात, बँक खात्यातून चोरी झाले 96 हजार रुपये)

युजर्सला हे नवे ऑप्शन अॅपच्या Sending Money येथे दिसून येणार आहे. तसेच गुगल पे युजर्सला बायोमेट्रिक किंवा या अन्य फिचर्सच्या माध्यमातून पैसे पाठवता येणार आहे. परंतु लक्षात असू द्या की, बायोमेट्रिक फिचर हे फक्त पैसे पाठवण्यासाठीच असणार आहे. हे फिचर 2.100 व्हर्जनमध्ये रोलआउट करण्यात आले आहे.