Google Pay वरुन इलेक्ट्रिक बिल भरणे पडले महागात, बँक खात्यातून चोरी झाले 96 हजार रुपये
G Pay (Photo Credits-Twitter)

ऑनलाईने पेमेंटच्या (Online Payment) माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. तर नुकत्याच एका मुंबईमधील (Mumbai) रहिवाशी नागरिकाने गुगल पे (Google Pay) या ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बिल (Electricity Bill)  भरले असता त्याची फसवणूक झाली असल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच या व्यक्तीच्या बँक खात्यामधून 96 रुपयांची रोकड गायब झाली आहे.

trak.in यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, गुगल पे युजर्स इलेक्ट्रिक बिल भरत होता. परंतु ट्रान्सझेक्शन फेल झाल्याचे दाखवल्याने त्याने गुगलवर कस्टअमर केअर क्रमांक शोधण्यास सुरुवात केली. गुगलवर सर्च केल्यावर त्यासंबंधित एक खोटा क्रमांक त्याला मिळाला. यावर युजर्सने दिलेल्या क्रमांकावर फोन करुन इलेक्ट्रिक बिल भरत असताना घडलेला प्रकार सांगितला. यावर फेक एक्झिक्युटिव्हने युजर्सला एक मेसेजच्या माध्यमातून त्यामध्ये लिंकचा वापर करण्यास सांगितले.

या लिंकवर युजर्सने क्लिक केल्यावर त्याच्या खात्यामधून काही वेळातच त्याच्या बँक खात्यामधून हजारो रुपये चोरीला गेल्याचे त्याचा कळले. तसेच गुगल पेसाठी युजर्सने ज्या बँक खात्यासंबंधित माहिती दिली होती त्यामधून पैसे गायब झाले होते.(UPI च्या माध्यमातून पैसे पाठवताना 'या' पद्धतीने काळजी घ्या, नाहीतर फसवणूक होईल)

यापूर्वी सुद्धा ऑलनाईन पेमेंटच्या माध्यमातून पैसे चोरीला किंवा फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा खोट्या गोष्टींना बळी पडू नये असे आवाहन करण्यात येते. तसेच बँक संबंधित कोणताही माहिती अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करु नये असे ही बँकेकडून ग्राहकांना सांगण्यात येते.

तसेच काही दिवसांपूर्वी ऑनलाईन बिअर खरेदी करण्याच्या नादामध्ये एका तरूणीने सुमारे 87 लाख रूपये गमावल्याचा प्रकार समोर आला होता. गूगल सर्चमध्ये मिळालेल्या एका नंबरवरून ऑनलाईन बिअर खरेदी केली होती. मात्र या व्यवहारदरम्यान युवतीने 87 लाख रूपये गमावले.