Google चं  ‘Smart Screenshot’ फीचर  लवकरच  देणार स्क्रिनशॉटच्या मदतीने सर्च करण्याचा पर्याय
Google (Photo: Shutterstock)

ऑनलाईन सर्चिंग (Online Searching) मधील अग्रेसर नाव म्हणजे गुगल (Google), या गुगलची जादू अशी काही पसरली आहे की आता काही शोधायचे झाल्यास आपणही पटकन 'गुगल कर ना'  असे बोलून जातो. आपल्या या वाढत्या युजरवर्गासाठी गुगलही नेहमीच नवनवीन फीचर आणून सर्चिंग सर्फिंग आणखीन सोप्पे करण्याचा प्रयत्न करत असते. अशाच प्रकारे येत्या काही दिवसात गुगल 'स्मार्ट स्क्रीनशॉट' (Smart Screenshot) हा एक नवा पर्याय सुरु करण्याच्या तयारीत आहे. या द्वारे युजर्सना स्क्रीनशॉट मध्ये असणारी माहिती, फोटो थेट ऑनलाईन पाहता येऊ शकते. तूर्तास या फीचरची चाचणी सुरु असून सुरुवातीला काही निवडक युजर्ससाठी हे लाँच करण्यात येईल यानंतर या फीचरची क्षमता तपासून मग हा अपडेट सर्वाना वापरता येणार आहे.

9to5 google या टेक पोर्टलच्या वृत्तानुसार, गुगलचे 10.61 व्हर्जन हे नवे अपडेट काहीच दिवसात सुरु होणार आहे, यानुसार स्मार्ट स्क्रिनशॉट हा पर्याय युजर्सना दिला जाईल. या फीचरच्या वापराची पद्धत तूर्तास स्पष्ट करण्यात आलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार युजरने आपल्या स्मार्टफोनवरून स्क्रीनशॉट घेतल्यास त्याला गुगल सर्च हा पर्याय दाखवला जाईल आणि यावर क्लिक केल्यास त्या स्क्रीनशॉटशी संबंधित माहिती थेट सर्च करता येईल असे सांगण्यात आले आहे.

Google लवकर लॉन्च करणार 'हे' मोठे 5 फिचर्स, युजर्संना होणार फायदा

दरम्यान, यापूर्वी गुगल इमेजच्या माध्यमातून रिव्हर्स इमेज सर्च या फीचर देखील सुरु करण्यात आले होते. तसेच गुगल सर्चमध्ये कंप्युटर व्हिजन आणि ऑग्मेंटेड रियालिटी फिचर नुसार एखादी गोष्ट 3D Image किंवा 3D Model सुद्धा पाहता येईल याची सोय करण्यात आली होती.यानंतर आता नव्याने येऊ शकणाऱ्या स्मार्ट स्क्रिनशॉटमुळे मेहनत वाचवून तुम्ही गुगलवर स्मार्ट सर्च करू शकणार आहात.