Google लवकर लॉन्च करणार 'हे' मोठे 5 फिचर्स, युजर्संना होणार फायदा
CEO of Google Sundar Pichai (Photo Credits: ANI)

गुगल (Google) कंपनीने त्यांच्या Google I/O 2019 मध्ये काही मोठे निर्णय घेतले आहेत. त्याचसोबत गुगलने आपले नवे ऑपरेटिंग सिस्टम Android Q ते सर्च रिजल्ट, गूगल लेंस, ड्रायव्हिंग मोड यांच्यासह विविध फिचर्सबद्दल खुलासा केला आहे. तर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या मते प्रायव्हसी आणि सिक्युरिटीबद्दल काही नियमात बदल करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्याचसोबत गुगलने गुगल पिक्सल 3a आणि 3a XL लॉन्च केले आहे.

तर आता लवकरच गुगल हे मोठे फिचर्स ग्राहकांसाठी लॉन्च करणार आहे. त्यामुळे युजर्संना नवीन फिचर्सह याचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर जाणून घेऊया कोणते हे नवे फिचर्स आहेत.

-गुगल सर्चसाठी कंप्यूटर व्हिजन

गुगल आता सर्चमध्ये कंप्युटर व्हिजन आणि ऑग्मेंटेड रियालिटी फिचर आणणार आहे. त्यामुळे युजर्सला सर्च करताना एखादी गोष्ट 3D Image किंवा 3D Model सुद्धा पाहता येणार आहे. जर तुम्ही 3D मॉडेलवर टॅप केल्यास तुम्हाला ऑग्मेंटेड रियलिटीच्या माध्यमातून रियल वर्ल्डचा व्यूव्ह पाहता येणार आहे.

-10 पटीने अधिक काम करणार गुगल असिस्टंट

गुगल असिस्टंट आता 10 पट अधिक गतीने काम करणार आहे. तसेच Hey Google न बोलताच आता गुगल काहीच सेकंदात विविध टास्क पूर्ण करणार आहे. गुगलच्या नव्या स्मार्टफोनमध्ये हे फीचर तुम्हाला वापरता येणार आहे. त्याचसोबत गुगल असिस्टंट तुम्हाला दैनंदिन जीवनाबद्दलच्या गोष्टी सुद्धा कोणत्या कराव्यात हे सुद्धा सांगणार आहे.

-ऑडिओ, रियल टाइम ट्रांन्सलेशनला सपोर्ट करणार Google Lens

गुगल लेन्स संदर्भात आता नवीन फिचर्स लवकरच लॉन्च करण्यात येणार आहेत. जर तुम्ही स्मार्टफोनच्या सहाय्याने एखाद्या रेस्टॉरंटच्या मेन्यूवर पॉईंट केल्यास तुम्हाला त्या रेस्टोमधील टॉप हायलाईट फूड कोणते आहे हे दाखविले जाणार आहे. त्याचसोबत रियल टाइम ट्रान्सलेशन सपोर्टसुद्धा गुगल लेन्सकडून करण्यात येणार आहे.

-नेक्स्ट जनरेशन ऑपरेटिंग सिस्टम Android Q

गुगलने Android Q Beta 3 लवकरच लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये प्रायव्हसी कंट्रोल, फोल्डेबल फोनसाठी सपोर्ट, 5G सह सिस्टम-वाइड डार्क मोड असे फिचर्स युजर्सला मिळणार आहेत.

-गुगल मॅप आणि सर्चसाठी Incognito mode

गुगल मॅप आणि सर्चसाठी Incognito mode लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे. तसेच हे मोड लवकरच यु ट्युबसाठी सुद्धा उपलब्ध होईल.

त्याचसोबत भारतात गुगल पिक्सल 3ए स्मार्टफोनची किंमत 39,999 रुपये आहे. तर गुगल पिक्सल 3ए एक्सएलची किंमत 44,999 रुपये आहे. दोन्ही स्मार्टफोन्स 4जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंटसह उपलब्ध आहेत. भारतात हे फोन्स 15 मे रोजी लॉन्च होणार आहेत.