Google (Photo: Shutterstock)

जगभरात विकसित झालेल्या बड्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना होणाऱ्या मानसिक व शारीरिक शोषणाच्या तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न चालू आहेत. याच पार्श्वभूमीवर गुगलने एक नवी कोरी वेबसाईट तयार करत असल्याची घोषणा नुकतीच केली आहे. ज्या माध्यमातून नोकरदारी मंडळींना त्रासाविरुद्ध वाचा फोडायला मदत होईल असे मानण्यात येतेय. अनेक ठिकाणी सुरु असणाऱ्या Workplace Harssement सारख्या गैरपद्धतीचा निषेध करण्यासाठी मागील वर्षी गुगलच्या सुमारे 20,000 कर्मचाऱ्यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता.

या वेबसाईटच्या तात्पुरत्या कार्यक्षमतेवर काम सुरु असून येत्या जून पर्यंत ही वेबसाईट लाँच करण्यात येईल असेही गुगलतर्फे सांगण्यात आले.Google ने भारतात लॉन्च केल्या YouTube Music आणि YouTube Premium या नव्या सुविधा; आता जाहीरातींशिवाय घ्या गाण्यांचा आनंद

ब्लॉगस्पॉटला दिलेल्या माहितीनुसार, "कर्मचाऱ्यांना तक्रार नोंदवण्यासाठी वेगवेगेळी माध्यमे एकत्र आणून एक नवीन सिस्टीम बनवत असल्याचे, गुगलचे अधिकारी मेलोनी पारकर यांनी सांगितले. तसेच अनेकदा या तक्रारी कंपनीच्या अंतर्गत दाबून टाकण्याची सक्ती केली जाते ही पद्धत संपवून कर्मचाऱ्यांना या तक्रारी कायदेशीर पद्धतीने कोर्टात मांडण्याची सोय उपलब्ध होणार असल्याची माहिती गुगलचे सीईओ सुंदर पिच्छाई यांनी दिली.

या वेबसाईटच्या लाँच नंतर सुरवातीचे चार महिने परीक्षण करून नंतर यात 'Support Person Programme' हा पर्याय देखील सामील कारण्यातव्येणार आहे. यानुसार कंपनीतर्फे होणाऱ्या त्रासाने पीडित व्यक्तीचे प्रतिनिधी देखील तक्रार नोंदवू शकतील अशी सोय करण्यात येईल. याचप्रमाणे या वेबसाईट मध्ये कामाच्या ठिकाणी शोषण, भेदभाव, वैचारिक दबाव, वैयक्तिक व कंपनीचे आचरण या मुद्द्यांना देखील काही दिवसात सामील करून घेतले जाईल, असेही मिलोनी पारकर यांनी सांगितले आहे.