Google ने भारतात लॉन्च केल्या YouTube Music आणि YouTube Premium या नव्या सुविधा; आता जाहीरातींशिवाय घ्या गाण्यांचा आनंद
YouTube Music (Photo Credits: Wikimedia Commons)

गुगलने (Google) युट्युब म्यूझिक (YouTube Music) आणि युट्युब प्रीमियम (Youtube Premium) या दोन सेवा भारतात लॉन्च करण्यात आल्या आहेत. युट्युब म्युझिक सामान्य युजर्ससाठी असून यात गाण्यांसोबत जाहीराती देखील दिसतात. तर युट्युब प्रीमियममध्ये युजर्स 99 रुपयांच्या मासिक दरात जाहीरातींशिवाय गाणी ऐकण्याचा आनंद घेऊ शकतात. युट्युबची ही नवी सेवा सावन, गाना, स्पोटीफाय यांसारख्या अॅप्सला जबरदस्त टक्कर देईल.

तसंच युट्युब म्यूझिक प्रीमियमवर 3 महिन्यांचे फ्री सब्क्रिप्शनची ऑफर देखील उपलब्ध आहे. मात्र ही ऑफर गुगलच्या कोणत्याही स्ट्रीमिंग सर्व्हिसचा वापर यापूर्वी न केलेल्या युजर्ससाठी उपलब्ध आहे.

युट्युब म्युझिक:

युट्युब म्युझिकवर तुम्ही ओरिजिनल गाणी, अल्बम्स, रिमिक्स, सुफी गाणी, गझल्स, लाईव्ह परफॉर्मन्स, म्युझिक व्हिडिओज इत्यादी पाहु शकता.

युट्युब प्रीमियम:

ही सर्व्हिस तुम्हाला 99 रुपयांच्या मासिक शुल्कात उपलब्ध होईल. त्यासोबतच एक महिन्याचा युट्युब प्रीमियम फ्री मेंबरशीप देखील मिळेल. युजर्स युट्युब अॅपवर बॅकग्राऊंडमध्ये व्हिडिओज प्ले करु शकतात आणि ऑफलाईन डाऊनलोड देखील करु शकतात.

हे अॅप पर्सनलाईज असून यात अनेक ऑप्शन्स देण्यात आले आहेत. हे मिनिमाईज केल्यावर यावर गाणी सुरु राहतील. त्यामुळे युजर्सला बॅकग्राऊंडमध्ये देखील गाणी ऐकता येतील. युट्युब व्हिडिओमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही.

पॅक्स

युट्युब म्यूझिक आणि युट्युब प्रीमियम या दोन्ही सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 129 रुपये प्रती महिना भरावे लागतील. त्याचप्रमाणे युट्युब प्रीमियमचा फॅमेली पॅक देखील उपलब्ध आहे. ज्यात 189 रुपये प्रती महिन्यात 6 युजर्स युट्युब प्रीमियम वापरु शकतात.