व्हिडिओ कॉलिंगसाठी सध्या लोकप्रिय असलेले Google Duo App मध्ये अपडेट आले असून आता ग्रुप व्हिडिओच्या माध्यमातून एकाच वेळी 8 जणांसोबत बोलता येणार आहे. हे फिचर जगभरात लॉन्च करण्यात आले आहे.
व्हॉट्सअॅपवर सुद्धा व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून एकमेकांसोबत बोलता येते. तर आता गुगल ड्युओ व्हॉट्सअॅपला टक्कर देत आहे. गेल्या महिन्यात या अॅपच्या सहाय्याने व्हिडिओ कॉलचे फिचर लॉन्च करण्यात आले होते. त्यावेळी फक्त चार जणांसोबत एका वेळी बोलता येत होते. परंतु नव्या अपडेटनुसार आता एकावेळी आठ जणांसोबत बोलता येणार आहे.(Facebook चा नवीन सुरक्षा फंडा, Instagram, Messenger च्या नव्या रुपासोबत करण्यात येणार हे बदल)
अँन्ड्रॉईड आणि आयओएससाठी हे फिचर्स देण्यात आले आहे. तर सुरुवातीला हे फिचर आधी काही मोजक्याच देशात लॉन्च करण्यात आले होते. तसेच व्हिडिओ कॉलिंगवेळी टेक्स मेसेज किंवा इमोजीसुद्धा पाठवता येणार आहे.