Ignaz Semmelweis And Handwashing Importance Google Doodle (Photo Credits: Screengrab)

कोरोना व्हायरसचे (Coronavirus) जगभरातील वाढते संकट पाहता या जीवघेण्या व्हायरसपासून वाचण्याचे उपाय शोधले जात आहेत. मात्र हा आजार होऊच नये याचा एकमेव नामी उपाय म्हणजे स्वच्छता बाळगणे (Cleanliness). आपण जाणून असाल मागील काही दिवसात तुमचे हात स्वच्छ धुणे (Handwashing)  हे किती महत्वाचे आहे हे सतत सर्व माध्यमातून सांगितले जातेय, 1947  साली एका व्यक्तीने हाच सल्ला दिला होता, किंबहुना या व्यक्तीला 'Father Of Infection Control' म्ह्णून देखील ओळखले जाते. ही व्यक्ती म्हणजे इग्नास सेमलवाईस (Ignaz Semmelweis). त्यांचा हा त्या काळातील सल्ला आजच्या जगातही किती महत्वाचा आहे हे दाखवून देण्यासाठी आज गुगल कडून एक खास डूडल (Google Doodle) साकारण्यात आले आहे.

20 मार्च 1947 रोजी, व्हिएन्ना जनरल रुग्णालयाच्या प्रसूती क्लिनिकमध्ये सेमलवास कार्य करू लागताच त्यांनी सर्व डॉक्टरांचे हात स्वच्छ असण्यावर भर दिला. जंतूंमार्फत रोग पसरतात हे सांगताना त्यांनी यावर रोख बसवण्यासाठी क्लोरीनयुक्त चुन्याने सर्व डॉक्टरांनी आपल्या हाताचे निर्जंतुकीकरण करावे अशी मागणी केली. Coronavirus: 'या' रक्तगटाच्या व्यक्तींना कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त धोका; वाचा काय सांगतेय सर्वेक्षण

Ignaz Semmelweis Google Doodle का आहे खास?

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हात धुणे. हात धुताना म्हणजेच त्यांचे निर्जंतुकीकरण करताना वारंवार साबण आणि पाण्याने हात धुण्यासाठी किंवा अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायसर वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. हा सल्ला सर्वात आधी ज्यांनी दिला त्यांच्या मार्फतच आता सर्वांना हात धुण्याचे महत्व पटवून सांगवे यासाठी गूगल ने इग्नास सेमलवाईस यांचे हे डूडल साकारले आहे.Coronavirus रोखण्यासाठी वारंवार वापरताय सॅनिटायझर? 'या' गोष्टी नक्की लक्षात घ्या

पहा Ignaz Semmelweis Google Doodle Video

दरम्यान, सध्या जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे, लाखाहून अधिक नागरिकांना या व्हायरसची लागण झाली आहे, यातील हजारोंना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशावेळी हा धोका आणखीन वाढू नये यासाठी प्रत्येकाने निदान वैयक्तिक पातळीवर स्वच्छता राखणे गरजेचे आहे.