आता इंटरनेट शिवाय युजर्सला Google Assistant वापरता येणार
Google Assistant (Photo Credits-Twitter)

Google Assistant सध्या 30 भाषांमध्ये जगभरातील 80 देशांत वापरले जाते. तर भारतात दोन वर्षांपूर्वी गुगल असिस्टंट लॉन्च करण्यात आले होते. गुगलने वोडाफोनसोबत आता फोन लाइन असिस्टेंट लॉन्च केले आहे. त्यामुळे आता या फिचर्ससाठी कोणतेही शुल्क युजर्सला मोजावे लागणार नाही आहेत. त्याचसोबत इंटरनेटशिवाय याचा वापर करता येणार आहे.

गुगल असिस्टंट यांच्या 0008009191000 या क्रमांकावर फोन करुन तुम्ही कोणत्याही प्रश्नाबाबत विचारु शकता. अशाच प्रकारे इंटरनेटसाठी सुद्धा तुम्ही कोणताही प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये रेल्वेची वेळ ते कोणत्या हॉटेलबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी आहे त्याबद्दल सांगितले जाणार आहे. यासाठी गुगलने वोडाफोन आणि आयडीया या कंपन्यांसोबत पार्टनशिप केली आहे. या अंतर्गत न्यूज आणि हवामान खात्याचा अंदाच काय आहे ते सुद्धा कळणार आहे. तर गुगल असिस्टंट हिंदी आणि इंग्रजी भाषेतून युजर्सला वापरता येणार आहे.(Reliance Jio Fiber Broadband Offer: जिओ फायबरची बंपर ऑफर, मोफत LED TV सोबत आणखी काय काय मिळतंय? पाहा सविस्तर)

गुगलने एका इव्हेंटदरम्यान गुगलवर सर्च करण्यासंबंधित काही बदलाव करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. त्याचसोबत काही नवे फिचर्ससुद्धा गुगलसाठी जोडण्यात आले आहेत. त्यामुळे आता एखाद्या युजर्सला बोर्डावर लिहिलेला मजकूर रियल टाइम ट्रान्सलेट करु शकता येणार आहे. तसेच ट्रान्सलेशन लाइव्ह रुपात सुद्धा ऐकता येणार आहे. हे फिचर भारताच्या तीन भाषांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

तर येत्या काही दिवसात गुगल 'स्मार्ट स्क्रीनशॉट' (Smart Screenshot) हा एक नवा पर्याय सुरु करण्याच्या तयारीत आहे. या द्वारे युजर्सना स्क्रीनशॉट मध्ये असणारी माहिती, फोटो थेट ऑनलाईन पाहता येऊ शकते. तूर्तास या फीचरची चाचणी सुरु असून सुरुवातीला काही निवडक युजर्ससाठी हे लाँच करण्यात येईल यानंतर या फीचरची क्षमता तपासून मग हा अपडेट सर्वाना वापरता येणार आहे.