Reliance Jio Fiber Broadband | (Photo credit: Archived, edited, symbolic image)

Reliance JioFiber Welcome Offer: रिलायन्स जिओ कंपनीने फोन, इंटरनेट यांच्यासोबत टीव्ही पाहण्याची सुवीधा देणारी जिओ फायबर ( Jio Fiber Broadband) ही ब्रॉडबँड सेवा गुरुवारपासून (5 सप्टेंबर) उपलब्ध करुन दिली. जिओ फायबर ही ऑप्टिकल फायबर केबल आधारित ब्रॉडबँड सेवा आहे. या सेवेचे नुकतेच कमर्शिअल लॉन्चिंग करण्यात आले. ही सेवा सुरु करताना जिओने ग्राहकांसाठी लॉन्चिग ऑफरही दिली आहे. त्यानुसार किमान मासिक शुल्क 699 रुपयांमध्ये कमाल 1 GBPS (जीबीपीएस) इंटरनेट वेगक्षमत जिओ फायबर योजनेद्वारे देऊ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सेवेचे विविध प्लान असून, गोल्ड आणि त्याहीपेक्षा मोठा प्लान ग्राहकाने खरेदी केल्यास त्याला एक एचडी टीवी दिला जाणार आहे. रिलायन्स जिओ फायबर बंपर ऑफरचा तपशील जाणून घेण्यासाठी खालील माहितीवर नजर टाका.

Reliance JioFiber Welcome offer तपशील खालील प्रमाणे

जिओ फायबर ब्रॉडबँड ऑफरमध्ये ब्रॉंज, सिल्वर, गोल्ड, डायमंड असे एकूण चार प्रकारचे प्लान आहेत. दरम्यान, गोल्ड प्लानचे शुल्क प्रतिमहिना 1299 रुपये इतके आहे. तसेच, गोल्ड आणि त्यापेक्षा मोठ्या प्लानसोबत एक एचडी टीवी दिला जाणार आहे त्याशिवाय 4K सेट टॉप बॉक्स, दूरचित्रवाणी संच, ओटीटी अॅप आदी गोष्टीही या प्लानसोबत मिळणार आहेत. सर्व प्लानवर अटी लागू असतील. विशेष म्हणजे ही योजना चित्रपट प्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो त्याच दिवशी त्वरित पाहण्याची संधी या योजनेमुळे प्रेक्षकांना मिळणार आहे. रिलायन्स जिओ फायबर योजना घ्यायची असेल तर, त्यासाठी एकरकमी जोडणी शुल्क 2,500 रुपये असून त्यात 1,500 रुपयांच्या अनामत ठेव रकमेचा समावेश असणार आहे.

जिओ फायबर ब्रॉडबँड ऑफरमध्ये असणारे 4 प्लान

प्लान

ब्राँज

सिल्वर

गोल्ड

डायमंड

शुल्क 699 849 1299 2499
स्पीड 100 100 250 500
डेटा 100

(+50)

200

(+200)

500

(+250)

1250

(+250)

*टीप: शुल्क: रुपये, स्पीड – MBPS, डेटा – GB मध्ये

जिओ फायबर ब्रॉडबँड ऑफरमध्ये काय काय मिळणार मोफत?

* देशात कधीही कुठेही फिक्स्डलाइन कॉलिंग मोफत

* टीव्ही व्हिडिओ कॉलिंग, कॉन्फरन्सींग सेवा 1200 रुपयांमध्ये (प्रतिवर्ष)

* गेमिंग सेवा 1200 रुपयांमध्ये (प्रतिवर्ष)

* घरी किंवा बाहेर कंटेंट शेअर करण्याची सुविधा

* मोफत नोर्टन सायबर सुरक्षा (5 उपकरणांवर)

(हेही वाचा, Reliance Jio GigaFiber आज होणार लॉन्च; पाहा असेल ब्रॉडबँड राउटर, काय काय मिळणार फ्री)

पाहा कोणाचा प्लान किती स्वस्त

पाहा कोणाचा प्लान किती स्वस्त
कंपनीचे नाव जिओ एअरटेल बीएसएनएल एसीटी
शुल्क 699 799 399 685
स्पीड 100 40 08 15
डेटा 150 100 असिमीत 100
*टीप: शुल्क: रुपये, स्पीड – MBPS, डेटा – GB मध्ये
मध्यम प्लान
शुल्क 1299 1099 1299 1159
स्पीड 200 100 10 100
डेटा 750 600 असीमित 400
*टीप: शुल्क: रुपये, स्पीड – MBPS, डेटा – GB मध्ये
महागडे प्लान
शुल्क 8499 1999 2349 5999
स्पीड 1000 100 24 1000
डेटा 5000 असीमित असीमित 2500
*टीप: शुल्क: रुपये, स्पीड – MBPS, डेटा – GB मध्ये

हप्त्यांवरही सेवा उपलब्ध

* जिओ फायबर 3,6 आणि 12 महिन्यांचा प्लान देईल

* दीर्ग प्लानमध्ये शुल्क (बिल) हप्त्यांनी भरण्याची सुविधा

* हप्त्यांवर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जाणार नाही.

दरम्यान, जिओचे निदेशक आकाश अंबानी यानी म्हटले आहे की, विद्यमान ग्राहकांना ब्रॉडबँड सेवा पहिल्याप्रमाणेच मिळत राहील. आता त्यांना मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक प्लान उपलब्ध असतील. अंबानी यांनी पुढे असेही म्हटले आहे की, भआरतात आता ब्रॉडबँड स्पीड 25 एमबीपीएस आहे आणि अमेरिकेसारख्या देशात हेच स्पीड 90 एमबीपीएस इतके आङे. मात्र, जिओ सर्वात स्वस्त प्लानमध्येही 100 एमबीपीएस स्पीड देत आहे.