Reliance Jio GigaFiber आज होणार लॉन्च; पाहा असेल ब्रॉडबँड राउटर, काय काय मिळणार फ्री
Reliance Jio | (File Image)

Reliance Jio Giga Fiber Today: बहुचर्चीत आणि तितकाच बहुप्रतिक्षीत रिलायन्स जिओ गिगा फायबर (Reliance Jio GigaFiber) ग्राहकांच्या भेटीला येत आहे. रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (((AGM)) (12 ऑगस्ट) कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज (5 सप्टेंबर 2019) जओ फाइबर ब्रॉडबँड सर्विस (Jio Fiber Broadband Service) लॉन्च करणार अशी घोषणा केली होती. त्याप्रमाणे रिलायन्स जिओ आज ही सेवा सुरु करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून रिलायन्स जिओ काही निवडक कंपन्या आणि सेक्टरमध्ये आपल्या सेवेची चाचणी घेत होती. तसेच, बीटा टेस्टसाठी काही ग्राहकांनाही फ्रीमध्ये सेवा देत होती. या सेवेच्या बदल्यात 5000 रुपयांचा रिफन्डेबल डिपॉजिट घेऊन राऊटर दिले जात होते.

दरम्यान, वार्षीक बैठकीत मुकेश अंबानी यांनी जिओ फायबर सर्विस प्लानही घोषीत केले होते. जे प्रतिमाहिना 700 रुपयांपासून ते 10,000 रुपये प्रतिमहिना इतक्या दरात होते. या प्लाननुसार, ग्राहकाला 100Mbps ते 1Gbps इतक्या स्पीडने इंटरने मिळणार आहे. जिओ फायबरनेट ब्रॉडबँड सर्विससोबत कंपनी ग्राहकांना फ्री 4K सेट-टॉप बॉक्स आणि फ्री लैंडलाइन कनेक्शन देणार आहे. कंपनीने म्हटले आहे की, निवडक प्लानसोबत सब्सक्राइबर्सना पॉप्युलर ओटीटी प्लैटफॉर्म्स ऐक्सेसही मिळणार आहे. जिओ फायबरसोबत युजर्सला होम फोन सर्विसही मिळेल. याच्या मदतीने देशभरात अनलिमिटेड कॉलिंग लँडलाइनच्या माध्यमातून करता येऊ शकेल. त्यासाठी यूजर्सला लँडलाईन हँडसेट खरेदी करवा लागेल.

दरम्यान, मुकेश अंबानी यांनी घोषणा केली होती की, जिओ फाइबर वेलकम ऑफरमध्ये कंपनी फाइबर सेवेसोबत वर्षभरासाठी जियो फॉरेवर प्लान घेणाऱ्या युजर्सला एक फ्री एचडी किंवा 4K LED टीव्ही देईल. सोबतच आपल्या जिओ कस्टमर्सला 4K सेट-टॉप बॉक्स फ्री देतील. रिलायन्स जिओने आतापर्यंत जिओ फायबर ब्रॉडबँड सर्विससह सर्व प्लान्स आणि इतर तपशील अद्याप जाहीर केला नाही. परंतू, आपण जर रिलायन्स जिओची ही नवी सेवा घेऊ इच्छित असाल तर, आपण जिओच्या संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करु शकता. (हेही वाचा, उद्या Reliance कडून होणार धमाकेदार घोषणा?; Jio GigaFiber, JioPhone 3 आणि Jio GigaTV लॉंच होण्याची शक्यता)

Jio GigaFiber इंटरनेटही पुरवणार

बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार, Jio GigaFiber सर्विस ग्राहकांना इंटरनेट सेवाही देणार आहे. मात्र अन्य DTH सेवा देणाऱ्या कंपन्या इंटरनेट सेवा देत नाहीत. त्यामुळे देशभरातील ग्राहक इंटरनेटची सेवा मिळविण्यासाठी Jio GigaFiber सेवा घेण्यास प्राधान्य देऊ शकतात.

Jio GigaFiber सेवेसाठी शुक्ल किती?

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, Jio GigaFiber सेवा घेण्यासाठी ग्राहकांना 4500 रुपये शुक्ल भरावे लागणार असल्याचे समजते. हे शुल्क ग्राहक Paytm, Jio Money, क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा कॅश पे करुनही भरु शकतात.