गुगलने (Google) त्यांचे प्रोडक्ट्सला अधिक उत्तम दर्जाचे बनवण्यासाठी नवे नवे फिचर्स लॉन्च करत आहे. याच दरम्यान कंपनीने आता गुगल अस्टिटंटसाठी (Google Assistant) एक नवे फिचर आणले आहे. या फिचरच्या मदतीने अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन या फिचरच्या माध्यमातून डिजिटल असिस्टंट वेब पेज वाचून दाखवार आहे. गुगल असिस्टंटच्या या नव्या फिचरला कंपनीने Read It असे नाव दिले आहे. गुगलने हे फिचर रोलआउट करताना असे म्हटले आहे की, युजर्सच्या स्मार्टफोनवरील कन्टेट वाचून दाखवणार आहे.
गुगलचे नवे फिचर भारतीय भाषांना सपोर्ट करतात. हे फिचर वापरण्यासाठी Hey Google किंवा Hello Google बोलून गूगल असिस्टंट सुरु करता येणार आहे. वेब पेज वाचण्यासाठी Read it कमांड द्यावी लागणार आहे. गुगलचे हे नवे फिचर 28 भारतीय भाषांना सपोर्ट करणार आहे. यामध्ये हिंदी, गुजराती, मराठी, तमिळ, तेलगू, मल्याळम, बंगाली आणि उर्दू भाषांचा सुद्धा समावेश आहे. सध्या रीड इट हे फिचर फक्त इंग्रजी भाषेला सपोर्ट करते. गुगलने असे म्हटले आहे की, 42 विविध भाषांमध्ये वेब पेजसाठी लाइव्ह ट्रान्सलेशन सुद्धा घेऊन येणार आहे. त्यानुलाप प्रत्येकाला त्यांच्या मायबोली भाषेत वेब पेज वाचून दाखवले जाणार आहे.(कोरोना व्हायरसमुळे गुगलने रद्द केला वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट Google I/O 2020; Xiaomi, Realme सह Microsoft च्याही कार्यक्रमांना फाटा)
रिड इट हे फिचर खास AI एल्गोरिद्मवर काम करते. याच्या मदतीने वेब पेजमधील कोणता भाग वाचून दाखवायचा आहे हे समजते. ऐवढेच नाही तर कोणत्याही वेब पेजमध्ये समस्या असल्यास त्याबाबत सुद्धा युजर्सला सांगणार आहे. रिड इट हे फिचर सध्या इंटरनेटवरील आर्टिकल आणि ब्लॉग पोस्टचा कन्टेट वाचण्यासाठी मदत करणार आहे.