काही भारतीय नागरिकांना मोबाईल आणि कप्युटरचे पासवर्ड लीक झाल्याचे अलर्ट त्यांना देण्यात आले. यामुळे युजर्समध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या प्रकारामुळे गुगलकडून युजर्सला अलर्ट मेसेज पाठवण्यात आला होता. त्यानुसार क्रोम ब्राउजरवर सर्च करण्यात आलेल्या काही विशिष्ट वेबसाईटमुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये काही युजर्सचा डेटा लीक झाला आहे.
गुगलने भारतीय युजर्सला मोबाईल किंवा लॅपटॉपवर एक अलर्ट जाहीर केला आहे. त्यानुसार युजर्सने त्यांचा पासवर्ड तातडीने बदलणे असल्याचे सुचित करण्यात आले आहे. त्यामुळे युजर्सने त्यांचा डेटा सुरक्षित रहावा यासाठी पासवर्ड बदलणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून वारंवार डेटा लीक होण्याचे प्रकार समोर येत आहेत. मात्र गुगलकडून डेटा चोरी होण्याचे प्रकार थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.(Security Tips: तुमच्या स्मार्टफोनमधील 'हे' फंक्शन लगेच करा बंद, हॅकर्सकडून डेटा चोरी होण्याची शक्यता)