Google 3D Animals Video Tutorial: 'या' सोप्प्या टिप्स वापरून Tiger, Giant Panda, Lion, Tiger आणि Penguin ला डिजिटली आणा तुमच्या घरी!  (Watch Video)
Google 3D Animals (Photo Credits: Google)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) लॉक डाऊन (Lock Down) काळात घरात अडकून पडलेल्या मंडळींसाठी टाईमपास करता यावा याचा एक नामी मार्ग स्वतः गूगल नेच निर्माण करून दिला आहे. वास्तविक हे गुगलचे एक जुनेच फिचर आहे जे नव्या स्वरूपात पुन्हा एकदा हिट ठरत आहे.Google 3D Animals असे या नव्या हिट ट्रेंडचे नाव आहे. यात विविध 3D इफ्केट सहित सिंह, वाघ, पेंग्विन, पांडा आणि कुत्रा यांसारखे प्राणी युजर्सना डाउनलोड करता येणार आहेत. हे प्राणी डिजिटली डाउनलोड करून तुम्ही अक्षरशः आपल्या घरी आणू शकता, मागील काही दिवसांपासून अनेक युजर्स या ट्रेंडला फॉलो करत काही फोटो शेअर करत आहेत. जर का तुम्हाला सुद्धा हे फीचर ट्राय करायचे असेल तर त्यासाठी काही सोप्प्या स्टेप्स वापरायच्या आहेत. या स्टेप्स अगदी सहज शब्दात आणि व्हिडिओच्या रूपात पाहून जाणून घ्या.. Google 3D Animals फिचर मधील वैशिष्ट्य सविस्तर जाणून घ्या.

Google 3D Animals फिचर कसा ऍक्टिव्ह कराल?

-जो प्राणी तुम्हाला 3D मध्ये पाहायचा आहे तो गुगलवर सर्च करा. उदा. तुम्हाला चित्ता पाहायचा आहे तर तुम्ही चित्ता सर्च करा.

- तुम्हाला एक बॉक्स दिसेल त्यावर 'Meet a life-sized cheetah up close' असे लिहिले असेल.

- 'view in 3D' या बटणावर क्लिक करा.

-'view in your space' असा पर्याय तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर हे फिचर अॅक्टीव्हेट होईल.

-तुमच्या मोबाईल कॅमेऱ्याचा अॅक्सेस गुगलला द्या. मग तुम्ही तो प्राणी मोबाईल मध्ये 3D इफेक्टमध्ये पाहू शकाल.

How To Activate Google 3D Animals Video

दरम्यान, जर का तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर तुमच्या फोनमध्ये Android 7.0.व्हर्जन असणे आवश्यक आहे तसेच जर का तुम्ही iPhone वावरत असाल तर iOS 11.0 किंवा त्याहून पुढील सिस्टीम असणे आवश्यक आहे. जर का तुमच्या फोनमध्ये ही सिस्टीम नसेल तर सेटिंग मध्ये जाऊन सॉफ्टवेअर अपडेट करून तुम्ही ही सिस्टीम फोनमध्ये घेऊ शकाल. गूगल 3D Animals फिचर वापरून पाहिल्यावर त्याचे फोटो आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका.