Smartphone (Photo Credit: Micromax)

स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी गेलेले प्रत्येकजण त्या स्मार्टफोनमधील कॅमेरा, स्टोरेज, रंग पाहूनच त्याची खरेदी करतात. मात्र, त्यावेळी तुमचा बजेट अधिक महत्वाचा असतो. प्रत्येकाला महागडा स्मार्टफोन खरेदी करता येत नाही. यामुळे स्मार्टफोन खरेदी करण्याअगोदर प्रत्येक अनेकदा विचार करतात. महत्वाचे म्हणजे, बजेट स्मार्टफोन खेरदी केला. तर, त्यात हवे तसे फिचर्स मिळत नाहीत. प्रत्येकाला कमी किंमतीत अधिक फिचर्स असलेल्या स्मार्टफोनची खरेदी करायची असते. मात्र, अशा लोकांसाठी बाजारात मॅक्रोमॅक्स (Micromax), इनफिनिक्स (Infinix), नोकिया (Nokia), रेडमी (Redmi) यांसारख्या कंपनीचे बजेट स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. या कंपनीच्या स्मार्टफोनची किंमत 6 हजार 999 इतकी असून यात जबरदस्त फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. हे देखील वाचा- Realme V15 स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच, काय असू शकतात याची खास वैशिष्ट्ये?

मॅक्रोमॅक्स ईन 1 बी-

मॅक्रोमॅक्स ईन 1 बी मध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच मिडियाटेक चा Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे. 13 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेकंडरी कॅमेरा हा दोन मेगापिक्सलचा आहे. तसेच सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये Android 10 ऑपरेटिंग सिस्टम आहे. या फोनमध्ये 5 हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची (2 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेज) किंमत 6 हजार 999 रुपये आहे.

इनफिनिक्स स्मार्ट 4

इनफिनिक्स स्मार्ट 4 हा मोबाईल सध्या चांगला ट्रेंडमध्ये आहे. या फोनमध्ये MediaTek Helio A22 प्रोसेसर 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज आहे. या फोनमध्ये Android 10 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. हा फोन फक्त 6 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे.

नोकिया सी 3 2020-

नोकिया सी 3 या स्मार्टफोन अन्ड्राईड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 16 स्टोरेजचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ड्युअल सिम असणाऱ्या या स्मार्टफोमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरादेखील देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 6 हजार 999 रुपये इतकी आहे.

शाओमी रेडमी 9 ए-

भारतीय बाजारात मोठी पसंती मिळवणाऱ्या रेडमी कंपनीच्या शाओमी रेडमी 9 ए स्मार्टफोनचाही या यादीत समावेश आहे. शाओमी रेडमी 9 ए या स्मार्टफोनमध्ये 6.53 इंची इतका डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन अॅन्ड्राईड 10 वर अधारीत काम करतो. तसेच यात 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. महत्वाचे म्हणजे, या स्मार्टफोनची किंमत केवळ 6 हजार 999 रुपये इतकी आहे.

लॉकडाऊनमुळे अनेक स्मार्टफोन कंपन्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीच्या सामोरे जावा लागले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनलॉकला सुरुवात झाल्यानंतर अनेक स्मार्टफोन कंपन्या पुन्हा एकदा बाजारात उतरल्या आहेत. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना आखताना दिसत आहेत.