
घड्याळ शौकीनांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमेरिकेतील टेक कंपनी Garmin ने भारतात पहिल्यांदाच लाइफस्टाइल GPS एनेबल्ड स्मार्ट वॉच लॉन्च केले आहे. Garmin Instinct असे या घड्याळाचे नाव असून, कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या घड्याळाची किंमत 26,990 रुपये इतकी आहे. जे लोक सतत घराबाहेर कार्यरत असतात अशा लोकांसाठी या घड्याळाची निर्मिती करण्यात आली आहे. फ्लेम रेड, ग्रेफाइट आणि व्हाइट या तीन रंगांमध्ये उपलब्ध असलेले हे घड्याळ तुम्हाला गारमिनच्या स्टोअर्समध्ये मिळू शकते. तसेच, पेटीएम मॉल आणि अॅमझॉनवरूनही तुम्ही ते खरेदी करु शकता.
या घड्याळाच्या फिचर्सबाबत सांगायचे तर, यात बॅरोमॅट्रिक ऑल्टीमीटर, 3x-अॅक्सिस कॉम्पस आणि जीपीएस देण्यात आले आहे. सीटल लोकेशन ट्रॅकिंगसाठी यात नव्हेगेशन सॅटेलाईटचाही सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच, अमेरिका आणि रशियाचे सॅटेलाईट्स – GLONASS आणि गॅलिलिओचाही यात समावेश आहे. या घड्याळात हार्ट सेन्सर आहे. जो स्ट्रेस लेवल आणि आपले हार्ट रेट ट्रॅक करतो. बॅटरी बॅकअपबाबत बोलायचे तर, कंपनीने केलेल्या दाव्यानुसार या घड्यालाची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर सुमारे १४ दिवस चालते.
दरम्यान, जीपीएस ट्रॅकिंग मोडमध्ये हे घड्याळ तुम्हाला 16 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देईल. तसेच, पावर सेव्हींग अल्ट्राटट्रॅक मोडवर 40 तासांपर्यंत बॅटरी चालू शकते. यात 16MB मेमरी देण्यात आली आहे. तसेच, वायरलेस सपोर्टही आहे. कंपनीचा दावा आहे की, अमेरिकी मिलिट्री स्टँडर्डकडून या घड्याळांची चाचणी घेण्यात आली आहे. हे घड्याळ शॉक प्रूफ आणि वॉटर प्रूफही आहे. याचा डिस्प्ले 128x128 इतका आहे.
सॉफ्टवेअर बेस्डही काही खास फिचर्स यात देण्यात आली आहेत. यात गारमीन एक्सप्लोर अॅपच्या माध्यमातून आपण पॉइंट्स, मॅप्स आपण एडीट आणि मॅनेज आणि डाऊनलोडही करु शकता. हे घड्याळ ऐडव्हेंचर करणारांसाठी खास बनविण्यात आले आहे. कंपनीने दावा केला आहे की, हे घड्याल वातावरण खराब असेल किंवा वातावरणात अचानक बदल केला तर ती माहितीसुद्धा हे घड्याळ देते. (हेही वाचा, 2G, 3G वापरून कंटाळा आला 4G झाले जुने; आता 5G येताच गतीमान होईल जगणे)
घड्याळाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, हे घड्याळ स्मार्टफोनशी कनेक्ट करता येऊ शकते. घड्याळाच्या सहाय्याने तुम्ही कॉल अॅक्सेप्ट किंवा रिजेक्ट करु शकता. सोशल मीडिया आणि इस्टंट मेसेजिंग अॅप्सची नोटिफिकेशन्सही तुम्ही या घड्याळाद्वारे पाहू शकता.