Flipkart Big Saving Days Sale 2022 मध्ये  Apple iPhone12 mini अवघ्या 41,999 रूपयांमध्ये; पहा स्मार्टफोन वरील डिल्स
Flipkart (Photo Credits: File Photo)

अ‍ॅपल आयफोन 12 मिनी (Apple iPhone12 mini) आता फ्लिपकार्ट वर अवघ्या Rs 41,999 वर उपलब्ध होणार आहे. ईकॉमर्स वेबसाईटवर हा The Big Saving Days सुरू राहणार आहे. अ‍ॅपल कडून iPhone 12 mini हा 2020 मध्ये आयफोन 12, प्रो आणि प्रो मॅक्स सोबत लॉन्च झाला होता. फ्लिपकार्ट वर The Big Saving Days जानेवारी 22 च्या मध्यरात्री पर्यंत सुरू राहणार आहे.फ्लिपकार्टच्या बिग सेव्हिंग डेज मध्ये 5.4 इंचाचा हा स्मार्टफोन 29% सूट सह उपलब्ध आहे. 64 जीबी ब्लॅक आणि ब्लू आयफोन मिनी ग्राहकांना 41,999 मध्ये उपलब्ध आहे.

रिअल मी जीटी मास्टर एडिशन हा 21,999 ला उपलब्ध आहे. त्यावर बॅंक ऑफर्सही उपलब्ध आहेत.  रिअल मी जीटी मास्टर एडिशन मध्ये 19,450 रूपयांच्या बंडल एक्सचेंज ऑफरची सोय आहे.  अन्यथा त्याची किंमत 25,999 आहे. Samsung Galaxy F12 हा स्मार्टफोन Rs 9,699 आणि Poco M3 Pro हा 13,999 ला उपलब्ध आहे.

अ‍ॅपल आयफोन 12 हा 53,999 ला काळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे. 64 जीबी स्मार्टफोन हा अमेझॉनवरही त्याच किंमतीमध्ये उपलब्ध आहे. अ‍ॅपलच्या आयफोन 12 मध्ये 6.1 इंच रेटिना शो आणि A14 बायोनिक चीपसेट आहे. iOS 14 सह आलेला फोन आता iOS 15 मध्ये अपग्रेड झाला आहे.

रिअल मी सी 11 2011 हा 7999  चा स्मार्टफोन 7499 मध्ये उपलब्ध होऊ शकतो. जुना फोन देऊन तुम्ही या फोनवर 6950 चा  इस्टेंट डिस्काउंट देखील घेऊ शकता. हे देखील नक्की वाचा: Amazon Great Republic Day Sale: ॲमेझॉन सेल आजपासून सुरू; मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपवर मिळवा मोठी सूट, जाणून घ्या खास ऑफर्स .

फ्लिपकार्टने यंदा सेलमध्ये ICICI Bank सोबत आकर्षक डिल्स केली आहेत. त्यामुळे त्यांच्या डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड वर 10% सूट चा इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज 2022     सेल मध्ये खरेदी पूर्वेऐ तुम्ही चोखंदळ ग्राहक असाल तर  Amazon Great Republic Day 2022 सेल सोबतच्या डिल्स सोबतही तुलना करून बघायला विसरू नका.