Flipkart Month End Sale: Asus स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार दमदार फिचर्सससह 5 हजार रुपयांपर्यंत सूट
Asus (Photo Credits: Twitter)

Asus कंपनीच्या स्मार्टफोनवर पुन्हा एकदा बंपर सूट मिळणार आहे. तर फ्लिपकार्ट मन्थ एन्ड सेल 26 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.या कंपनीच्या स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर आणि डिस्काउंटसह ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. 31 ऑगस्ट पर्यंत हा सेल सुरु राहणार आहे.

असुस कंपनीच्या स्मार्टफोनवर तब्बल 5 हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. त्याचसोबत ग्राहकाला ने-कॉस्ट EMI वर आपल्या पसंदीचा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तर जाणून घ्या फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये कोणत्या असुसच्या स्मार्टफोनवर बंपर सूट मिळणार आहे.

-Asus 6Z

असुस कंपनीचा 6z या स्मार्टफोनसाठी 48 MP कॅमेरा देण्यात आला आहे. सेलमध्ये 3 हजार रुपयांचा एक्सजेंच बोनससह ग्राहकाला खरेदी करता येणार आहे. त्याचसोबत 3 किंवा 6 महिन्याच्या नो-कॉस्ट EMI वर सुद्धा खरेदी करता येणार आहे.

-Zenfone 5Z

या स्मार्टफोनची मूळ किंमत 28,999 रुपये असून सेलमध्ये त्यावर 5 हजार रुपयांची सूट देण्यात येणार आहे. तसेच झेनफोन 5Z मध्ये 8GB RAM आणि 256 GB Storage असलेल्या वेरियंटची किंमत 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

-Zenfone Max Pro M1

सेलमध्ये फोनवर 500 रुपयांच्या डिस्काउंटसह ग्राहकाला खरेदी करता येणार आहे.तसेच 3GB RAM आणि 32 GB Storage असणाऱ्या वेरियंटची किंमत 7,499 रुपये ठेवण्यात आली आहे.

-Zenfone Max M1

जेनफोन मॅक्स M1 वर सेलदरम्यान 500 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे त्याची किंमत 6,499 रुपये झाली आहे.(Redmi Note 8 Pro: 64 मेगापिक्सेलच्या कॅमे-यासह लवकरच लाँच होणार हा जबरदस्त स्मार्टफोन, काय असतील याची वैशिष्ट्ये)

त्यामुळे ग्राहकांना आता फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये भरघोस सूटचा फायदा घेत जबरदस्त फिचर्स असलेले असुस कंपनीचे स्मार्टफोन घेता येणार आहेत. तसेच स्मार्टफोनसंबंधित अधिक माहिती हवी असल्यास ती फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.