Flipkart वर येत्या 1 डिसेंबर पासून Big Shopping Days सेल सुरु होणार, युजर्सला मिळणार धमाकेदार ऑफर्स
Flipkart | Representational Image | (Photo Credit: Official)

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर बिग शॉपिंग डेद येत्या 1 डिसेंबर पासून सुरु होणार आहे. फ्लिपकार्टवरील हा सेल 5 दिवस सुरु राहणार असून ग्राहकांना धमाकेदार ऑफर्स मिळणार आहेत. या सेलमध्ये टॅबलेट्स, टीव्ही, लॅपटॉप या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर शानदार डील्स उपलब्ध होणार आहेत. रविवार पासून सुरु होणाऱ्या या सेलमध्ये रिअलमी 5, सॅमसंग गॅलेक्सी एस 9, आयफोन 7 सारखे स्मार्टफोन 1 डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या सेलमध्ये धमाकेदार ऑफर्ससह खरेदी करता येणार आहेत.

टेलिव्हिजनवर सेलदरम्या 75 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. फ्लिपकार्टचा असा दावा आहे टिव्ही आणि इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ड्सवर सुद्धा 70 टक्के सुट देण्यात येणार आहे. त्याचसोबत लॅपटॉप आणि कॅमेरावर 80 टक्के सूटचा फायदा ग्राहकांना घेता येणार आहे. HDFC बँकेच्या युजर्सला अतिरिक्त डिस्काउंट ऑफर केली जाणार आहे.

या सेलदरम्यान स्मार्टफोनबाबत बोलायचे झाल्यास, रियलमी 5 स्मार्टफोन 8,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनची मुळ किंमत 9,999 रुपये आहे. गुगल पिक्सल 3a स्मार्टफोनवर 5 हजार रुपयांपर्यंत सुट दिली जाणार आहे. iPhone 7वर 3 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळवत 24,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.(Facebook आणि Twitter ला टक्कर द्यायला विकिपीडियाचा नवा उपक्रम- WT:Social)

तर शाओमीने (Xiaomi) चीनमध्ये नुकताच पाच रिअर कॅमेऱ्यांचा Mi CC9 Pro हा फोन लाँच केला. शाओमी आता पेंटा (पाच कॅमेरे) टेक्निकचा वापर फोल्डेबल फोनमध्येही करणार आहे. काही वृत्तांनुसार, शाओमीने फोल्डेबल फोनमध्ये पॉप अप कॅमेरा सेटअप दिला आहे. हा फोन कधी लाँच होईल याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, मात्र येत्या काही महिन्यात हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे.