Flipkart वर 10 ऑक्टोबरपासून सेल ; या प्रॉडक्ट्सवर मिळेल बंपर सूट
फ्लिपकार्ट (File Photo)

दरवर्षीप्रमाणे यंदाही सण-उत्सावांना सुरुवात होण्यापूर्वी शॉपिंग सेलच्या सोहळ्याचा आरंभ होणार आहे. ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर 10 ऑक्टोबरपासून सेलची सुरुवात होणार आहे. यात ग्राहकांना विविध उत्पादनांवर बंपर सूट मिळेल. याबद्दल कंपनीने सांगितले की, ''द बिग बिलियन डेजचे पाचवे एडिशन 10 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्ट डॉट कॉमवर सुरु होईल. यात ग्राहकांना विविध उत्पादनांवर सूट मिळेल. त्यात फॅशन, होम अप्लएंसेज, फर्निचर, बुक्स, स्मार्ट डिव्हाईसेज, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेजचा सहभाग आहे.''

कंपनीने सांगितले की, फॅशन, होम फर्निचर, अप्लाएंसेज, खेळणी, पुस्तकं, ब्यूटी आणि स्मार्ट डिव्हाईसेसवर 10 ऑक्टोबरपासून सेल सुरु होईल. यानंतर 11 ऑक्टोबरपासून मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेसवर सेलची सुरुवात होईल. त्याचबरोबर 12-14 ऑक्टोबरपर्यंत सर्व रेंजमधील प्रॉडक्ट्सवर सूट मिळेल.

कंपनीचे मुख्य कार्यकारी कल्याण कृष्णामूर्ति यांनी सांगितले की, ''गेल्या काही महिन्यांपासून आम्ही आमच्या सेलर्ससोबत काम करत आहोत. आम्ही देशाच्या प्रत्येक तळागाळातील ग्राहकापर्यंत पोहचण्यासाठी आणि स्वस्त उत्पादने पुरवण्यासाठी खास योजना राबवली आहे.''