Flipkart Big Billion Days sale:स्मार्टफोनवर चक्क ₹ १५,००० पर्यंत डिस्काऊंट
Flipkart (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

येत्या १० ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल सुरु होत आहे. सुरु झालेल्या दिवसापासून पुढचे पाच दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये ग्राहकांवर ऑफर्सची बरसात करण्यात आली आहे. यात स्मार्टफोनवर दिली जाणारी ऑफर तर चक्क आश्चर्यकारक आहे. बंपर डिस्काऊंटबाबत आपल्या साईटवर कंपनीने विविध ऑफर्सबाबत माहिती दिली आहे.

फ्लिपकार्टच्या साईटवरील माहितीनुसार, सर्वाधिक डिस्काऊंट सॅमसंग गॅलेक्सी एस ८ वर देण्यात येत आहे. हा डिस्काउंट चक्क १६,०००रुपये इतका आहे. ४५.९९९ रुपये किमतीच्या सॅमसंग गॅलेक्सी एस ८ स्मार्टफोन फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्ही केवळ २९,९९० रुपयांना खरेदी करु शकाल. या फोनच्या स्पेसिफिकेशन्सबाबत बोलाल तर, फनमध्ये एचडी प्लस, वायरलेस चार्जिंग यांसारखी अनेक फिचर्स आहेत. गॅलेक्सी S8मध्ये ५.८ इंचाचा QHD+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रेझ्युलेशन 1440x2960 पिक्सल इतके आहे. फोनमध्ये ३००० एमएएच इतक्या क्षमतेची बॅटरी आहे. तसेच, ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज क्षमताही आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस ८ शिवाय सॅमसंग गॅलेक्सी ऑन ६वरही ३५०० रुपयांची सूट देण्यात आली आहे. १५,४९० रुपये किमतीवर लॉन्नच झालेला हा फोन सेलमध्ये केवळ ११,९९९ रुपयांना विकला जाणार आहे. याशिवाय सॅमसंग जे३ प्रो हा फोन ८,४९०रुपयांऐवजी ६,१९० रुपयांना आणि सॅमसंग ऑन नेक्स्ट (६४ जीबी)१७,९०० रुपयांऐवजी ९,९९० रुपयांना विकला जाणार आहे. सॅमसंगच्याच ऑन ८वरही सूट आहे. मात्र, ती सूट किती आहे याबाबत कंपनीने खुलासा केला नाही. तुम्ही जर एखादा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर, बिग बिलियन डेज हा पर्याय तुम्हाला उत्तम ठरु शकतो.

दरम्यान, सेलमध्ये लेनोवो के८ प्लस हा फोन ६,९९९रुपयांना उपलब्द आहे. या फोनची बाजारातील किंमत १०,९९९रुपये इतकी आहे. एन्टेक्सचा एंडी ६ फोन ८,४९९ऐवजी ३,९९९ रुपयांना आणि पॅनॉसॉनिकचा पी९१ हा फोन ७,९९९ रुपयांऐवजी २,९९९रुपयांना विकला जात आहे. याशिवाय ४००० एमएएच पॉवरवाली बॅटरी असलेला यू कंपनीचा स्मार्टफोन ५,४९९ रुपयांना खरेदी करण्याची संधीही ग्राहकांना उपलब्ध आहे.