Fire-Boltt ने लॉन्च केली AI पॉवर्ड ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशन
Fire-Boltt (Photo Credits-Twitter)

Fire-Boltt ने पहिलेच AI पॉवर्ड ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहे. फायर बोल्ट स्मार्टवॉचला इंट्रोडक्टरी किंमतीवर म्हणजेच 4,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हे स्मार्टवॉच खरेदी करायचे असेल तर ते फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. फायर बोल्ट स्मार्टवॉचमध्ये प्री-लोडेड फिचर्सचे सपोर्ट दिला आहे. फायर बोल्ट स्मार्टवॉच तीन विविध कलर ऑप्शन ब्लॅक, ब्लू आणि पिंक मध्ये येणार आहे. फायर बोल्टच्या AI पॉवर्ड स्मार्टवॉच मध्ये वॉइस असिस्टंट फिचर्स जसे Google आणि Siri चे सपोर्ट मिळणार आहे. त्याचसोबत या ब्लुटूथ कॉलिंग स्मार्टवॉचमध्ये एक क्विक डॉयल पॅड, व्यू कॉल हिस्ट्री आणि सेव्ह कॉन्टॅक्ट सारख्या फिचर्सचा सपोर्ट मिळणार आहे.

फायर बोल्ट स्मार्टवॉचमध्ये एक इन-बिल्ट माइक आणि स्पीकर्सचा सपोर्ट मिळणार आहे. यामध्ये काही धमाकेदार फिचर्स जसे अलार्म, टाइमर, वेदर अपडेट, रिमांडरसह हेल्थ रिलेटेड मॉनिटर आणि हार्ट रेट ट्रॅकिंग, ब्लड ऑक्सिजन लेव्हल आणि ब्लड प्रेशरचा सपोर्ट मिळणार आहे. फायर बोल्ट एआय स्मार्टवॉचमध्ये 10 इन बिल्ट सपोर्ट मोड आणि एक स्ट्रेस मॅनेजमेंट सिस्टिमचा वापर करण्यात आला आहे. स्मार्टवॉच IP67 सर्टिफिकेशन्ससह येणार आहे. यामध्ये स्पोर्ट अॅक्टिव्हिटीचा सपोर्ट मिळणार आहे. स्मार्टवॉचमध्ये पॉवरफुल बॅटरीसह सिंगल चार्जिंगमध्ये 10 दिवसांची बॅटरी लाइफ मिळणार आहे.(Amazon Prime Video वर युजर्सला करता येणार 30 सेकंदांचा व्हिडिओ, जाणून घ्या अधिक)

Counterpoint च्या लेटेस्ट रिसर्च रिपोर्ट्सनुसार फायर बोल्ट स्मार्टवॉच ब्रँन्ड हा भारतात सर्वाधिक वेगाने वाढणारा स्मार्टफोन ब्रँन्ड आहे. फायर-बोल्ट ब्रँडने मागील तिमाहीच्या तुलनेत 394 टक्के वाढ नोंदवली आहे. तसेच, फायर बोल्ट स्मार्टवॉच ब्रँडचा एकूण बाजारातील हिस्सा सुमारे 17% आहे.