Amazon Prime (Photo Credits-Twitter)

अॅमेझॉन कडून एक नवे प्राइम व्हिडिओ (Prime Video) फिचर सुरु केले जाणार आहे. त्यानुसार युजर्सला प्लॅटफॉर्मवर टीव्ही शो आणि सिनेमांचे व्हिडिओ क्लिप शेअर करण्याची सुविधा देणार आहे. क्लिप ही सोशल मीडियात डायरेक्ट मेसेजच्या माध्यमातून शेअर करता येऊ शकणार आहे. ही सुविधा सध्या iOS युजर्ससाठी उपलब्ध करुन दिली आहे. मात्र फक्त US मध्ये युजर्ससाठी रोलआउट करण्यात आली आहे, त्यानुसार युजर्सला फक्त लिमिटेड क्रमांकातील शो मधील क्लिप शेअर करता येणार आहे. यामध्ये The Boys, The Wilds, Invincible आणि Fairfax चा समावेश आहे.

जेव्हा तुम्ही या चार टाइल्समधील एक पाहत असाल तर तुम्हाला 30 सेकंदाच्या क्लिप ऐवजी नव्या Share A Clip बटणावर क्लिक करु शकता. तुम्ही क्लिक केल्यानंतर स्ट्रिमिंग सेवेची एक स्क्रिन सुरु करण्यासाठी शो ला थांबवेल आणि तेथे तुम्हाला व्हिडिओ क्लिप एडिट करता येईल. त्याचसोबत एखाद्याला व्हिडिओ क्लिप शेअर करण्यापूर्वी त्याचा तुम्हाला प्रिव्हू सुद्धा पाहता येणार आहे.(Facebook समोर नवी अडचण, कंपनीवर लावण्यात आला Meta नावाची चोरी केल्याचा आरोप)

अॅमेझॉनचचे असे म्हणणे आहे की, येत्या काळात युजर्सला आपल्या ओरिजनल सिनेमा आणि सीरिजची क्लिप शेअर करण्याची तयारी केली जात आहे. कंपनीने हे फिचर खासकरुन आपल्या युदर्सला कंटेट शेअर करण्यासाठी तयार केले आहे. कारण आतापर्यंत अॅमेझॉनचे कोणताही कॉम्पेटिटर प्लॅटफॉर्म अशा प्रकारची सर्विस देत नाही.अॅमेझॉन प्राइमचे हे लेटेस्ट फिचर दाखवून देते की, कंपनीला कंटेट पाहण्यासह शेअर करण्याची पद्धत बदलायची आहे.