Facebook लवकरच लॉन्च करणार News Tab, पब्लिशर्सना मिळणार पैसे
फेसबुक (Photo Credits-Twitter)

सोशल मीडियावरील जगप्रसिद्ध प्लॅटफॉर्म फेसबुकने 2014 मध्ये ट्रेंडिंग फिचर लॉन्च केले होते. त्यावर ट्रेंन्डिंग आर्टिकल्स दाखवण्यासह संबंधित अन्य माहितीसुद्धा दिली जात होती. मात्र आता सध्या फेसबुकवर विविध घटनांमुळे आरोप लावण्यात आले आहेत. त्याचसोबत खास लोकांचा फायदा होण्यासाठी फेसबुक संबंधित छेडछाड केली जात असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. परंतु 2018 मध्ये या गोष्टींवर ताबा मिळवण्यासाठी युजर्सच्या प्रायव्हसीमध्ये बदल करण्यात आले होते. त्यानंतर आता फेसबुक एक नवं सेक्शन न्यूज टॅब नावाने लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

रिपोर्टच्या नुसार, शुक्रवारी 25 ऑक्टोबरला फेसबुक न्यूज टॅब लॉन्च करणार आहे. या टॅबमध्ये अवघ्या काही सेकंदात न्यूज पब्लिशर्सला न्यूज दाखवली जाणार आहे. The Washington Post यांच्या एका रिपोर्टनुसार, या प्रकरणी संबंधित काही लोकांनी असे म्हटले आहे की फेसबुक न्यूज टॅबमध्ये कन्टेंटसाठी कंपनीकडून पैसे सुद्धा दिले जाणार आहेत.(Facebook वरील पोस्टला किती Likes मिळाले हे आता दिसणार नाही)

गेल्या महिन्यात The Wall Street Journal यांच्या एका रिपोर्टनुसार असे सांगितले होते, न्यूज सेक्शनमध्ये न्यूज ऑर्गनाइजेशनसोबत संपर्क केला आहे. फेसबुकने त्यांच्या न्यूज टॅबसाठी लायसन्स कन्टेंटसाठी न्यूज पब्लिशर्सला पैसे देणार आहे. दरम्यान फेसबुकवर सातत्याने फेक न्यूज आणि अफवा थांबवण्यासाठी कोणतेही उपाय करत नसल्याचे आरोप करण्यात येत आहेत. मात्र फेसबुककडून फेक न्यूजसाठी आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत परंतु त्याचे कोणतेही त्याचे परिणाम दिसून येत नसल्याने युजर्स त्रस्त झाले आहेत.