Facebook | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

17 जुलै रोजी असणाऱ्या वर्ल्ड इमोजी डे (World Emoji Day) च्या निमित्ताने फेसबुकने (Facebook) नवे इमोजीस (New Emojis) सादर केले आहेत. फेसबुक मेसेंजरवर हे इमोजीस विथ साऊंड (Emojis With Sound) उपलब्ध असतील. त्यांना 'Soundmojis' असे नाव देण्यात आले आहे. कंपनीनुसार, Soundmojis हे इमोजीचा पुढचा टप्पा असून याद्वारे युजर्संना शॉर्ट साऊंड क्लिप मेजेंजर्सवर पाठवता येणार आहेत. यात क्लॉपिंग, क्रिकेट, लाफटर असे इमोजीस साऊंथ सह देण्यात येतील.

दररोज लोकांकडून तब्बल 240 कोटीहून अधिक मेसेजेस इमोजीसह पाठवले जातात. इमोजीमुळे चॅट संभाषणाला रंग चढतो. शब्दात करु शकत नसलेल्या भावना इमोजीद्वारे अगदी सहज व्यक्त करता येतात. असे मेसेंजरच्या मेसेजिंग प्रॉडक्ट्सचे व्हीपी Loredana Crisan यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. पुढे त्या म्हणाल्या की, इमोजी बोलत असेल तर तो कसा आवाज करेल? याची कल्पना करा. तसे Soundmojis असतील, असे Crisan यांनी म्हटले आहे.

युजर्ससाठी आम्ही Soundmoji library लॉन्च करत आहोत. नवे साऊंड इफेक्ट्स आणि प्रसिद्ध साऊंड बाईट्सने ती नियमितपणे अपडेट होत राहील, असे कंपनीने सांगितले आहे. प्रत्येक साऊंड इमोजीकडून सादर केला जाईल. हा साऊंड येत असताना व्हिज्युअल इमोजी देखील युजरला दिसेल. (New IT Rules Impact: 2 जुलै रोजी Facebook जाहीर करणार रिपोर्ट, किती अकाउंट्सवर कारवाई केल्याचे सांगणार)

Soundmojis चा वापर करण्यासाठी युजर्संना सर्वप्रथम मेसेंजर अॅपवर जावे लागेल. चॅट स्टार्ट करा आणि स्माईली फेसवर क्लिक करा. त्यानंतर expressions menu ओपन होईल. मग लाऊडस्पीकर आयकॉन सिलेक्ट करा. तेथे तुम्हाला Soundmojis चा प्रीव्ह्यु पाहायला मिळेल. तेथून तुम्ही हवा असलेला इमोजी पाठवू शकता. युजर्ससाठी नावीण्यपूर्ण आणि गंमतीशीर फिचर लॉन्च करणे कंपनीला आवडते. यामुळे लोक कनेक्टेड राहतात आणि त्यांना स्वत:ला व्यक्त होण्याची चांगली संधी मिळते.