युजर्सच्या प्रायव्हसीला धोका उद्भवत असल्याने Facebook कडून हजारो App बंद
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: The KISS Marketing Agency)

युजर्सचा पर्सनल डेटा चोरी करणारे अॅप फेसबुक (Facebook) कडून बंद करण्यात आले आहेत. तर फेसबुकने हे पाऊल कॅब्रिज अॅनालिटिका प्रकरणी सुरु असलेल्या तपासावर आधारित आहे. या दरम्यान फेसबुक यांनी युजर्सच्या डेटा लीक प्रकरणी असे म्हटले आहे की, यापूर्वी पेक्षा आता अधिक युजर्सचा डेटा चोरी झाला आहे.

फेसबुकने एका ब्लॉकपोस्टमध्ये असे सांगितले की, 2018 मध्ये डेटा चोरी बाबत तपास सुरु करण्यात आला. यामध्ये ब्रिटिश कंसल्टेंसी कॅब्रिज यांनी युजर्सच्या परवानगी शिवाय युजर्सचा डेटा एक्सेस केला जात असून त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला आहे. त्यामुळेच फेसबुकने आता 400 डेवलपर्स संबंधित दहा हजार अॅप बंद केले आहेत.

तर फेसबुकला मदत न केल्याने 10 हजार अॅप बंद करण्यात आले आहेत. यामधील सर्व युजर्सच्या प्राव्हसीची मुख्य प्रश्न असून त्यांच्या डेटा चोरी होण्याची शक्यता अधिक असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तसेच शुक्रवारी बोस्टन स्टेट कोर्टाने एक फाइल उघडली असता त्यामध्ये 69 हजार अॅप बंद करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.(फेसबुकला माहिती आहे तुम्ही SEX कधी केला होता! काही अॅप लीक करतायत तुमची माहिती)

नेमके काय प्रकरण आहे?

फेसबुक जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म आहे. तसेच जगभरात फेसबुकचे 200 करोड पेक्षा अधिक युजर्स आहेत. मात्र फेसबुक युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवण्यात सफल होऊ शकला नाही. परंतु 2016 मध्ये कॅब्रिज अॅनालिटिका यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूकीवेळी युजर्सचा डेटा हॅक करुन विविध नावाने वोटर प्रोफाइल बनवण्याचे काम केले होते.