सोशल मीडियावरील जगप्रसिद्ध असणारे माध्यम म्हणजे फेसबुक (Facebook). परंतु गेल्या काही महिन्यांनपासून फेसबुकबाबत असुरक्षितता वाढत चालली आहे. तसेच काही वेळा युजर्सची माहिती लीक होते तर काही वेळेस कंपनीचा डेटा चोरी झाल्याचा प्रकार यापूर्वी घडला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा फेसबुक कंपनीकडून लाखो युजर्सचे ईमेल आयडी (Email ID) अपलोड करण्यात आले आहेत.
फेसबुक प्रायव्हीवर आता दिवसेंदिवस प्रश्न उपस्थित राहू लागला आहे. तर कंपनीने मार्च महिन्यात प्रथम साईन-अप युजर्ससाठी ई-मेल पासवर्ड वेरिफिकेशन ऑप्शन बंद केले होते. त्यानंतर काही प्रकारणात युजर्सचे अकाऊंट सुरु केल्यानंतर त्यांचे कॉन्टॅक्ट्स फेसबुकवर अपलोड केले गेले आहेत.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019 साठी राजकीय पक्षांच्या फेसबुकवर 10 कोटींच्या जाहिराती; भाजप पक्षाकडून जाहिरातींवर सर्वाधिक खर्च)
रॉयटर्सने फेसबुकला दिलेल्या माहितीनुसार, जवळजवळ 15 लाख युजर्सते ईमेल आयडी अपलोड झाल्याची माहिती दिली आहे. परंतु हे ईमेल्स कोणासोबत शेअर केलेले नाहीत. मात्र ज्या युजर्सचे ईमेल अपोलड करण्यात आलेले आहेत त्यांना कंपनीकडून नोटीफिकेशन पाठवण्यात येणार आहे. परंतु कंपनीने ही समस्या सोडवण्यात आली असल्याचे कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.