युजर्सची प्रायव्हसी जपण्यासाठी फेसबुकने (Facebook) हे नवे फिचर ल़़ॉन्च केले आहे. मेसेंजरसाठी (Messenger) हे नवे लॉकिंग फिचर (Locking Feature) लॉन्च करण्यात आले असून यामुळे युजर्सचे खाजगी मेसेजेस इतर कोणालाही पाहता येणार नाहीत. त्यामुळे तुमचे चॅट सुरक्षित राहण्यास नक्कीच मदत होईल. या नव्या फिचरमुळे तुम्ही फेस (Face) आणि टच (Tounch) आयडीने (ID) अॅप अनलॉक करु शकाल. (फेसबुकच्या 5 सीक्रेट ट्रिक्स तुम्हाला माहित आहेत का? घ्या जाणून)
मेसेंजर प्रायव्हसी आणि सेफ्टीचे डिरेक्टर जय सुल्वियन यांनी सांगितले की, मेसेंजरमध्ये प्रायव्हसी सर्वात महत्त्वाची आहे. तिथे तुमचे मेसेज, व्हिडिओ चॅट, कॉल्स आणि मेसेंजर रुम सुरक्षित असेल. विशेष म्हणजे तुमचा टच आणि फेस आयडी फेसबुककडे स्टोर राहणार नाही किंवा तो कोठेही ट्रान्समिट करण्यात येणार नाही. हे फिचर सध्या आयफोन आणि आयपॅडमध्ये उपलब्ध असून काही महिन्यातच अॅनरॉईडवर उपलब्ध करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
Facebook Newsroom Tweet:
Messenger Introduces App Lock and New Privacy Settings https://t.co/SVV0nHrg17
— Facebook Newsroom (@fbnewsroom) July 22, 2020
या फिचरचा दुहेरी फायदा आहे. या फिचरमुळे कोण थेट तुम्हाला मेसेज किंवा कॉल करेल हे तुम्ही ठरवू शकता. त्यामुळे कोणाचे आलेले कॉल, मेसेजेस Requests Folder मध्ये जातील आणि कोण तुम्हाला थेट कॉल किंवा मेसेज करु शकणार नाही, हे तुम्ही ठरवू शकता. अॅप लॉक हे फिचर प्रायव्हसी सेटिंगमध्ये उपलब्ध आहे. तिथे जावून हे फिचर तुम्ही अॅक्टिव्हेट करु शकता. इंस्टाग्राममधील मेसेज कंट्रोल फिचर प्रमाणे हे काम करेल. तसंच युजर्सची प्रायव्हसी आणि सुरक्षितता जपण्यासाठी आम्ही विविध माध्यमातून प्रयत्न करत आहोत, असे फेसबुकने स्पष्ट केले.
या फिचरचे टेस्टिंग करण्यात येईल. यामुळे कोणाकडूनही आलेला मेसेज पाहायचा की नाही ते तुम्ही ठरवू शकता. सध्या जगभरात मेसेंजरचे 1.3 बिलियन युजर्स असून 2021 पर्यंत युजर्सची संख्या 2.4 बिलियन होण्याची आशा आहे.